Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

रिसोड कर्जमुक्ती यादी

रिसोड कर्जमुक्तीच्या यादीत ११,५८४ शेतकरी; तात्काळ 'आधार प्रमाणीकरण' करण्याचे सहाय्यक निबंधकांचे आवाहन

Risod Loan Waiver List: कर्जमुक्ती योजना २०२६ च्या ११,५८४ शेतकारांना तालुका रिसोडत जिल्हा सहकारी बँकेद्वारा 'आधार प्रमाणिकरण' करण्याचे आवाहन झाले आहे.


रिसोड कर्जमुक्तीच्या यादीत ११५८४ शेतकरी तात्काळ आधार प्रमाणीकरण करण्याचे सहाय्यक निबंधकांचे आवाहन

Risod Loan Waiver List |


​रिसोड (Risod Loan Waiver List) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत रिसोड तालुक्यात आतापर्यंत ११,५८४ कर्जदार शेतकरी सभासदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी यादीतील शेतकऱ्यांनी आपले 'आधार प्रमाणीकरण' तात्काळ पूर्ण करावे, असे आवाहन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (रिसोड) गजानन फाटे यांनी केले आहे.

​बँकनिहाय शेतकरी संख्या:
प्रसिद्ध झालेल्या ११,५८४ पात्र सभासदांमध्ये:
​जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (सेवा सहकारी संस्था): ६,६९३ सभासद
​राष्ट्रीयकृत बँका: ४,८९१ सभासद
​आधार प्रमाणीकरणाची सद्यस्थिती:


तालुक्यातील ११,५८४ पात्र सभासदांपैकी ८,६८४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित २,९०० कर्जदार सभासदांचे प्रमाणीकरण अजूनही बाकी आहे.

​प्रशासनाकडून प्रत्यक्ष संपर्क मोहीम:
उर्वरित २,९०० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत विशेष मोहीम राबवली जात आहे. यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते संबंधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत.

​"कर्जमुक्ती योजनेचा लाभ विनाअडथळा मिळण्यासाठी यादीत नाव असलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार प्रमाणीकरण त्वरित पूर्ण करून घ्यावे."
-गजानन फाटे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रिसोड)

Related to this topic: