Kanhan Water Shortage: बारा महिने वाहणा-या जिवनदायी कन्हान नदीकाठावर वसलेल्या कन्हान शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भयंकर भेडसावत असल्याने कन्हान युथ फाउंडेशनचे संयोजक कॅप्टन सतीश बेलसरे
"पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा." प्रशासन, जनप्रतिनिधीं विरोधात नागरिकांचा संताप
कन्हान (Kanhan Water Shortage ) : बारा महिने वाहणा-या जिवनदायी कन्हान नदीकाठावर वसलेल्या कन्हान शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भयंकर भेडसावत असल्याने कन्हान युथ फाउंडेशनचे संयोजक कॅप्टन सतीश बेलसरे यांचे नेतृत्वात शेकडो संतप्त नागरिकांनी कन्हान नगरपरिष देवर धडक मोर्चा काढुन पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत संतप्त नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी दीपक घोडके यांना त्यांच्या कक्षात तब्बल तासभर घेराव घालत तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी केली.
कन्हान-पिपरी शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईची (Kanhan Water Shortage) समस्या गंभीर बनते. नगरपरिषद प्रशासन व जनप्रतिनिधीं केवळ आश्वासनांची खैरात वाटत जनते ची दिशाभुल केल्याचा आरोप नागरिकांनी केला. वर्षा नुवर्षे समस्या असतानाही कोणतीही ठोस व दीर्घका लीन योजना राबविण्यात आलेली नाही. विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी जनतेला पिण्याचे पाणी देऊ शकत नसतील, तर त्यांच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण आहे. निवडणुकांमध्ये मोठमोठी आश्वासने देणारे अनेक नेते आता नागरिकांच्या मूल भुत समस्यांकडे दुर्लक्ष करित असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सत्रापुर, शिव नगर, एमजी नगर, स्वामी विवेकानंद नगर, पिपरी, रामनगर, वाघधरे वाडी, गणेश नगर आदी भागांमध्ये नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होते. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असुन काही भागात अनेक दिवसांपासुन पाणी पुरवठाच बंद असल्याच्या तक्रारी आहेत.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी दरदर भटकावे लागते. अनेक कुटुंबांना (Kanhan Water Shortage) खासगी टँकरचे महागडे पाणी विकत घेण्याची वेळ आली. जनता तहानेने व्याकुळ असताना प्रशासन मात्र कागदोपत्री कामे आणि बैठकीतच व्यस्त असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. मोर्चा दरम्यान कॅप्टन सतीश बेलसरे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तात्काळ प्रभावी उपाययोजना न झाल्यास आंदो लन अधिक तीव्र केले जाईल. नागरिक आता आश्वास नांना कंटाळली असुन प्रत्यक्ष कृतिची अपेक्षा करित आहे. कन्हान-पिपरीत वाढता जनक्षोभ हा प्रशासना च्या अपयशाचा आणि जनप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा आरसा ठरत आहे. आतातरी नगरपरिषद जागी होणार की पुन्हा एकदा नागरिकांच्या पदरी केवळ आश्वासनां चीच निराशा पडणार, याकडे संपुर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
शहरात दिवसेंदिवस तीव्र पाणी टंचाईमुळे (Kanhan Water Shortage) संतप्त नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरून नगरपरिषद प्रशा सना विरोधात जोरदार एल्गार पुकारत शेकडो नागरि कांनी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला. "पाणी द्या, नाहीतर खुर्ची खाली करा", "तहानले ल्या जनतेला न्याय द्या", "झोपलेले प्रशासन जागे व्हा. " अशा घोषणांनी नगरपरिषद परिसर दणाणुन गेला. संतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी दीपक घोडके यांचा तब्बल एक तास घेराव घालत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी फाऊंडेशनचे रोतेश पात्रे सुर्यभान फरकाडे, नितेश भरणे,गणेश रामापुरे, शैलेश झेंडे, वर्षा पात्रे, शबनम पात्रे, धारा लोंढे, भाग्य श्री विंचुलकर, सुरेन्द्र पात्रे, लबना पात्रे, अनिकेत खडसे, दिनेश शेंडे, अक्षय खडसे, सपना पागे, अमृता पागे, सावित्री शेंडे, उषा लोन्डे सह आंदोलनात कन्हान युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.