Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

कन्हान-पिपरी नगरपरिषद

पाणी टंचाई निवारणास कन्हान न प पदाधिकारी, अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

Kanhan-Pipri Municipal Council: कन्हान-पिपरी नगरपरिषद ने उन्हाळ्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. नागरिकांना नियमित


पाणी टंचाई निवारणास कन्हान न प पदाधिकारी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

Kanhan-Pipri Municipal Council |

कन्हान नदीलगत शहर असुन बाराही महिने एका दिवसा आड एक वेळ पाणी पुरवठा

जल शुध्दीकरण योजनाने शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करावा

कन्हान (Kanhan-Pipri Municipal Council) : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तापमा नामुळे संभाव्य पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने विविध भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी मोहीम राब वली. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना निश्चित केल्या.

 रविवार (दि.१२) एप्रिल ला कन्हान-पिपरी नगरपरिषद (Kanhan-Pipri Municipal Council) नगरा़ध्यक्षा राजेंद्र शेंदरे, उपाध्यक्ष रिंकेश चवरे, मुख्याधिकारी दिपक घोडके, सभापती आशा माहातो तसेच अभियंता सोनाली नागरगोजे, सुपरवाय झर व इतर कर्मचा-यानी संबंधित भागांमध्ये जाऊन पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली व नागरि कांना भेडसावणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती घेतली. पाहणी दरम्यान एम जी नगर येथील पाण्या च्या टाकीची ड्रेन व्हॉल्व द्वारे तात्काळ स्वच्छता कर ण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच आव श्यक ठिकाणी बोअरवेल सुरू करणे किंवा दुरुस्ती करणे, विहिरींची दुरुस्ती व देखभाल करणे याबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तांत्रिक बाबींचा सखोल विचार करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे नियोजन करण्यात आले. प्रशासनाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कामे विलंब न लावता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असुन नागरिकांना कोणत्या ही प्रकारची पाणी टंचाई जाणवु नये यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नागरिकांनाही पाण्याचा जपुन व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करून पाणी बचतीसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले.

कन्हान नदीलगत शहर असुन बाराही महिने एका दिवसा आड एक वेळ पाणी पुरवठा

कन्हान-पिपरी शहर (Kanhan-Pipri Municipal Council) हे कन्हान नदीच्या काठावर वसवेले असुन सुध्दा ग्राम पंचायतचे रूपातंर नगरपरि षदेत जानेवारी २०१४ मध्ये झाल्यावर एक वर्ष १९ दिवस प्रशासक म्हणुन तत्कालिन ३ तहसिलदार पारशिवनी यांनी प्रशासक म्हणुन कारभार सांभाळला. नगरपरिषदेच्या निवडणुक होऊन पहिल्या पाच वर्ष भाजपा + शिवसेना युतिच्या अँड. आशाताई पनिकर  दि.२०/०२/२०१५ ते १९/०८/२०१७ अडीच वर्ष तर श्री शंकर चंहादे दि.२०/०८/२०१७ ते १९/०२/२०२० पर्यंत अडीच वर्ष नगराध्यक्ष पद भुषविले. दुस-या पाच वर्षात शिवसेना (शिंदे) च्या करूणाताई आष्टणकर  २०/०२/२०२० ते १९/०२/२०२५ पर्यंत म्हणजे पुर्ण पाच वर्ष नगराध्यक्षा म्हणुन पदभार सांभाळला. नगर परिषद पासुन राज्यात, केंद्रात भाजपा शिवसेना युती च्या काळात कन्हान-पिपरी नगरपरिषदेचा १२ वर्ष  लोटुन नगरपरिषद पदाधिकारी, प्रशासन कन्हान नदी काठावरील कन्हान -पिपरी शहराला साधा शुध्द पाणी पुरवठा तर करू शकले नाही. तर कन्हान नदीच्या ढोल्यातुन पाणी ओढुन टाकीत घेऊन त्यात नाममांतर बिलिचींग टाकुन शहरातील नागरिकांना एका दिवसा आड पिण्याचे पाणी पुरवठा करणारी जिल्हयातील ही एकमेव नगरपरिषद असावी. असे म्हणणे वाव ठरणार नाही. हीच शहरवासीयांची मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

जल शुध्दीकरण योजनाने शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करावा

नगरपरिषदेच्या तीस-या पंचवार्षिक कार्यकाळा करिता २०२६ ला नव्याने कन्हान नगरपरिषदेच्या पदभार ग्रहण करणारे नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, उपाध्य क्ष रिंकेश चवरे आणि त्यांचे सहकारी सभापती, नगर सेवकांनी उशिरा का होईना या भर उन्हाळयात पाणी टंचाई निवारणास कन्हान न प अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे नागरिकांनी त्यांचे कौतुक करून नगरपरिषदेच्या पहिल्या पाच वर्षा पासुन जल शुध्दी करण योजने काम सुरू असुन अद्याप पुर्ण न झाल्याने तात्काळ जल सुध्दीकरण योजनेचे राम पुर्ण करून कन्हान-पिपरी शहराला वर्षभर दररोज दोन वेळ नाही तर फक्त एक वेळ तरी शुध्द पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकात जोर धरू लागली आहे.

Related to this topic: