Shri Ram Navami Utsav: सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राच्या वतीने भजन कीर्तन , प्रसाद वितरण आणि शोभायात्रा काढुन तीन दिवसीय श्रीराम नवमी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली .
"जय श्री राम , जय जय श्री राम" च्या जयघोषाने कन्हान परिसर दुमदुमले
कन्हान (Shri Ram Navami Utsav) : सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राच्या वतीने भजन कीर्तन , प्रसाद वितरण आणि शोभायात्रा काढुन तीन दिवसीय श्रीराम नवमी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
श्रीराम नवमीच्या (Shri Ram Navami Utsav) दिवशी शिवपंचायत हनुमान मंदिर गांधी चौक येथे राम , लक्ष्मण , सीता यांच्या प्रतिमेचे युवा समाजिक कार्यकर्ता शुभम बावनकर , ऋषभ बावनकर यांच्या हस्ते जलाभिषेक , विधिवत पूजा अर्चना , हवन पुजा करण्यात आली आणि दुपारी माऊली भजन मंडळ रायनगर , स्वामी विवेकानंदनगर यांचे भजन कीर्तन करुन श्रीराम नवमी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

सकाळी हनुमान चालीसा पाठन , महाआरती करण्यात आली . दुपारी नवदुर्गा भजन मंडळ, कांद्री यांचे भजन कीर्तन करण्यात आले आणि सायंकाळी महाप्रसाद वितरण करण्यात आला . शनिवार (दि.२८) मार्च रोजी दुपारी विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ , शिवाजी नगर कन्हान यांचे भजन कीर्तन करण्यात आले व सायंकाळी महाआरती करुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत डीजे , राम दरबार , रामाचा रथ , घोडे आकर्षणाचे बिंदु ठरले . यात्रे दरम्यान शिवशंभु आखाडाच्या तरुणांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करुन भाविकांना मन मोहित केले. रामच्या वेशभूषेत तन्मय चरडे , सीताच्या वेशभूषेत वैष्णवी किरपाने , लक्ष्मणच्या वेशभूषेत अंश कोलते , हनुमानच्या वेशभूषेत तेजस बावनकुळे प्रामुख्याने सहभागी झाले होते.
यात्रा शिवपंचायत हनुमान मंदिर येथुन काढुन महामार्गने आंबेडकर चौक , तारसा चौक , सात नंबर नाका , संताजी नगर चौक होऊन परत महामार्गाने परत हनुमान मंदिर गांधी चौक येथे यात्रेचे समापन करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांनी जय श्री राम , जय जय श्री राम" च्या जयघोष केल्याने संपुर्ण कन्हान परिसर दुमदुमुन गेले होते व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या (Shri Ram Navami Utsav) प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , कन्हान - पिपरी नगरपरिषद नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , गटनेता मनोज कुरडकर , नगरसेविका सुचिता माटे , सरपंच सुनिल जामदार , लोकेश दमाहे , सुर्यभान चकोले , अविनाश कांबळे , अशोक पाटील , गजराज देवीया , बालकिशन गुप्ता , राजेंद्र हटवार , जीवन मुंगले , संदीप कुकडे , आशिष इंगोले , विनोद केने , विनोद यादव , रविंद्र दुपारे , मनोहर कोल्हे , चंद्रशेखर बावनकुळे , निखिल तांडेकर , नरेश आरबी , विक्की सोलंकी , मोहनसिंग यादव , नंदलाल यादव , राजेश बोपुलकर , अश्विन कांबळे , कवडु बारई, चंद्रभान मंगर , शंकर सराेदे , कांचनमाला माकडे , सरला बावनकर , सुषमा मस्के , रंजना किरपाने , अर्चना तांडेकर , मीना कळंबे , ममता मेश्राम , चंदा बावनकर , लता बावनकुळे , श्रुती किरपाने , मीना गिऱ्हे , पारबता लंगडे , सुरेखा नागपुरे , शोभाबाई मंगर , वडेबाई , गिताबाई भिलकर , मिराबाई तिडके , शारदा भंडारे , तनुजा वानखेडे , भारती महल्ले सह आदि भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राचे प्रमुख शुभम बावनकर , आयुष संतापे , ऋषभ बावनकर , हिमांशु सावरकर , सुजल यादव , शिव यादव , ओम यादव , उद्यय माहुरे , वेदांत बावनकुळे , अमन यादव,प्रथमेश कोल्हे , सुर्या संतापे , शुभम संतापे , आर्यन संतापे यांच्या सह आदि सदस्यांनी परिश्रम घेतले.