Environmental Conservation: कन्हान नगरपालिकेच्या संस्थेशी पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑर्गनायझेशनने सहकार्य करून झाडे लावण्याचा महत्त्वाचा क्रम राबवला गेला. लोकसंख्या, युवा आणि महिलांचा मोठा उपस्थिती
कन्हान (Environmental Conservation) : पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजीनगर वार्ड क्रमांक ८ येथे रविवारी (५ जुलै २०२६) उत्साहात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिक, युवक, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमामागे संस्थेचे प्रमुख राजकुमार चहांदे यांचा पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प असून, त्यांच्या पुढाकारातून कन्हान परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येते. केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संगोपन करून ती मोठी करण्यावरही संस्थेचा विशेष भर असतो. गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे परिसरात हरित पट्टा वाढण्यास मदत होत असून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृतीही होत आहे.
यावेळी कन्हानचे नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे तसेच नगरसेवक हरीश तिडके यांनी स्वतः उपस्थित राहून वृक्षारोपणात उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.

उपक्रमात पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक, महिला, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध प्रकारच्या सावली, फळझाडे व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. सहभागी नागरिकांनी स्वतः रोपे लावत त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली.
यावेळी (Environmental Conservation) पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व, वाढते तापमान, घटणारी जंगलसंपत्ती, प्रदूषण आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून प्रत्येकाने लावलेल्या झाडाचे संगोपन करून ते जगविणे हीच खरी पर्यावरण सेवा असल्याचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
संस्थेच्या वतीने भविष्यातही कन्हान परिसरात शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांच्या कडेला तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधिक असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.