Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

बॉक्सिंग स्पर्धा खेळाडु

कांद्रीत सिलंबम व थाय बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंचा भव्य सत्कार

Boxing tournament competitor: नागपुर जिल्ह्यातील थाय बॉक्सिंग व सिलंबम स्पर्धेमध्ये समर्थन मिळवून कांद्रींच्या खेळाडूंना यशस्वतीत मदत करण्याच्या कामगिरीसाठी त्यांचा गौरवित करत सत्कार सोहळा


कांद्रीत सिलंबम व थाय बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंचा भव्य सत्कार

Boxing tournament competitor |

कन्हान (Boxing tournament competitor) : रामटेक येथे दोन दिवसीय सिलंबम स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून ३३ पदके पटकावणा ऱ्या परमात्मा एक कलापथक मर्दानी आखाडा कांद्री च्या खेळाडुंचा भव्य सत्कार सोहळा कांद्री जिल्हा परि षद शाळा मैदानात परमात्मा एक बहुउद्देशीय संस्था आणि परमात्मा एक कलापथक मर्दानी आखाडा कांद्री यांच्या संयुक्त विद्यमाने सिलंबम व थाय बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंचा भव्य सत्कार सोहळा  उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमास प्पामुख्याने उपस्थित ज्येष्ठ नागरिक मुन्नाजी यादव, कांद्री नगर पंचायत उपाध्यक्ष धर्मेंद्र सरोदे, कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, पोलीस पाटील कांचन मस्के, शिक्षक हरीष पोटभरे, महाराष्ट्र थाय बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव अजय खेडकरकर, नागपुर जिल्हा थाय बॉक्सिंग अध्यक्ष नरेश कोक्कडे, नागपुर जिल्हा थाय बॉक्सिंग ग्रामीण सचिव डॉ. अनिल गजभिये आदी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँ साहेब, महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यानंतर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या खेळाडुंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळा डुंच्या यशाचे कौतुक करित त्यांना भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या कर्तृत्वाने कांद्री परिसराचे नाव लौकि क करणाऱ्या खेळाडुमुळे उपस्थितांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनी वंजारी यांनी करून सूत्रसंचालन नागपुर जिल्हा थाय बॉक्सिंग ग्रामीण सचिव व सिलंबम प्रशिक्षक इंद्रपाल वंजारी यांनी तर सुरक्षा वैद्य यांनी आभार व्यकत केले. याप्रसंगी नगरसेवक उमेश वाडीभस्मे, शिवाजी चकोले, राकेश लांजेवार, निकेश मेश्राम, पवन कुभलकर, सुत्तम मस्के, पत्रकार मोतीराम रहाटे, ऋषभ बावनकर, शुभम बावनकर, आयुष संतापे, लोकेश दमाहे, विजय पारधी, नरेश कामडे, यशवंत आंभिलढुके, रोहित पानतावणे, दिनेश राऊत, मनोज भोले, रोशन भोयर, विवेक वांडरे, दुर्गेश कोमटी, भूषण तिरोडे, नैतिक मोखरकर, विशाखा वंजारी, स्विटी वांढरे, शकुंतला चांदेकर, कीर्ती सरोदे, रेखा मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ओम पंधरे, पियुष डेडुलकर, प्रज्वल मोखरकर, सुरक्षा वैद्य, ओम सावर कर, ऋतुजा वंजारी, कनक वाडीभस्मे, आरजु शर्मा, अमित लाडे, नैतिक बोरकुटे, अमर तिरोडे आदींनी परिश्रम घेतले.