Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

काळोणा स्मशानभूमी शेड

काळोणा गावकऱ्यांच्या संघर्षाला यश; स्मशानभूमी शेड व रस्त्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर

Kalona Cemetery Shed: अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या चिखली तालुक्यातील काळोणा गावाच्या विकासाला अखेर गती मिळाली आहे. गावकऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनाला यश


काळोणा गावकऱ्यांच्या संघर्षाला यश स्मशानभूमी शेड व रस्त्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर

Kalona Cemetery Shed |

चिखली (Kalona Cemetery Shed) : अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या चिखली तालुक्यातील काळोणा गावाच्या विकासाला अखेर गती मिळाली आहे. गावकऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनाला यश मिळत असून स्मशानभूमी शेड व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आमदार निधीतून एकूण १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

काळोणा गावाचे नाव अधिकृत नकाशावर नसल्याने अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. या समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विविध आंदोलने, निवेदने आणि ग्रामस्थांना एकत्र करून गावाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.
उपोषणादरम्यान दिलेला शब्द पाळत सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या निधीतून स्मशानभूमी शेडसाठी ५ लाख रुपये आणि स्मशानभूमी पोहोच रस्त्यासाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. गुरुवारी (दि. ४ जून) या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.

यावेळी चिखली तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार गायकवाड यांनी काळोणा गाव दत्तक घेण्याची घोषणा केली. (Kalona Cemetery Shed)  गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच गावाच्या प्रश्नांसाठी संतोष भुतेकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचेही त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाला सुभाष दराडे, नायब तहसीलदार गायकवाड, युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल थुट्टे, सामाजिक कार्यकर्ते संतोष आटोळे, सरपंच  मल्लूशेठ विलास गाडेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मशानभूमी व रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाल्याने काळोणा गावाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या इतर प्रलंबित प्रश्नांनाही आता गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.