Breaking News
  • भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी, पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना सीसीटीव्हीत कैद
  • नागपूरात महाल येथील बडकस चौकापासून काही अंतरावर असलेल्या आयचित मंदिर परिसरात एका व्यक्तीवर चाकू हल्ला, उपचार सुरु
  • पुण्याच्या भोर तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा भातशेतीला फटका
  • कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; काही तासांत १३० नागरिकांना चावा
  • नाशिकमध्ये हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवर हल्ला
  • नाशिक- मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू
  • स्मार्ट मीटरविरोधात मालवण-वायरी ग्रामस्थ आक्रमक, महावितरणच्या कार्यालयात ग्रामस्थांचा धडक मोर्चा
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी विद्यार्थी आत्महत्या

कळमनुरीत बी.ए.च्या विद्यार्थ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

Kalamnuri Student Suicide: प्रविण विश्वनाथ खुडे (वय 21) हा समर्थ महाविद्यालय, हिंगोली येथे बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून


कळमनुरीत बीएच्या विद्यार्थ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

Kalamnuri Student Suicide |

कळमनुरी (Kalamnuri Student Suicide) : कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी येथील प्रविण विश्वनाथ खुडे (वय 21) हा समर्थ महाविद्यालय, हिंगोली येथे बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. तो सकाळी घरातून "कॉलेजला जात आहे" असे सांगून निघाला होता. मात्र, कळमनुरी शहराजवळ उमरा पाटील परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत एका शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

घटनेची (Kalamnuri Student Suicide) माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जमीर नाईक, पोलीस हवालदार दिलीप पोले तसेच गुंजकर, जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही आत्महत्या नसून प्रविणचा घातपात करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी सांगितले की, शवविच्छेदन (पोस्टमार्टेम) अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नातेवाईकांचा घातपाताचा आरोप हा त्यांचा दावा आहे. अधिकृतरीत्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टेम अहवाल आणि पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.