Farmer subsidy Case: शेतकारांनी कळमनुरीत अनुदान घोटाळ्याच्या आघाडीवर रास्ता रोकण्यासाठी आंदोलन केले. अतिवृष्टीच्या नुकसानातून शेतकऱ्यांना मदत न मिळावयाचे आरोप
खरडणी अनुदान घोटाळा
आखाडा बाळापूर (Farmer subsidy Case) : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बु ,येगाव, कृष्णापूर येथील शासकीय खरडणी अनुदानात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही दुसरीकडे खोट्या लाभार्थ्यांची नावे अनुदान यादीत समाविष्ट केली असा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने १२ जुलै रोजी कळमनुरी तालुक्यातील महामार्गावर डोंगरगाव पूल येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष चैतन्य चव्हाण व शेतकऱ्यांनी दिला होता यानंतर सदर प्रकरणी चौकशी होऊन ६ लाख १५ हजार ७०० रूपये अपहार झाला असल्याची तक्रार तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी दिल्यानंतर सहायक कृषी अधिकारी एस.एस.संगमवार विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यामुळे १२ जुलै रोजी आंदोलन (Farmer subsidy Case) तुर्त स्थगिती करण्यात आले आहे सदर प्रकरण शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणखी दोषींवर कारवाई करावी. तसेच नुकसान झालेल्या पिंपरी,येगाव,कृष्णापूर, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा २४जुलै रोजी महामार्गावर डोंगरगाव पूल येथे आंदोलन करण्यात येणार आहे असे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष चैतन्य चव्हाण, शेतकरी ज्ञानेश्वर सुदाम जाधव, संतोष रंगराव जाधव, विठ्ठल संभाराव उपरे , शुभम मुळे शेतकऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.
सन २०२४-२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराने पिंपरी,येगाव, कृष्णापूर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते नुकसान होऊनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही हा रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही व्हावी व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी मदत मिळेपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना सदर प्रकरणाचा शेतकऱ्यांना सोबत घेऊन पाठपुरावा करणार आहे.
- चैतन्य चव्हाण , तालुका अध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना कळमनुरी