Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

मराठी पत्रकार परिषद

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक

Marathi press conference: कळमनुरीत मराठी पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. उदगीर येथे अधिवेशनासाठी निर्णय घेण्यात आला, पत्रकारांना ओळखपत्र व नवीन सदस्य नोंदणीसाठी सूचना देण्यात आल्या.


मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक

Marathi press conference |

कळमनुरी (Marathi press conference) : कळमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक दि. १३ एप्रिल रोजी कळमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. सदर बैठक (Marathi press conference) मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी तथा माजी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत चर्चा होऊन, दि.१९ एप्रिल रोजी उदगीर येथे जाण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. इच्छुक पत्रकारांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले.

तसेच पत्रकार बांधवांसाठी ओळखपत्र (Marathi press conference) तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच संघटनेचे सभासद नोंदणी शुल्क भरणे याबाबतही चर्चा होऊन विद्यमान सदस्यांनी शुल्क भरणे तसेच नवीन सदस्य नोंदणी करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस जिल्हाउपाध्यक्ष दिलीप खोडके, शफी डोंगरगावकर, तालुकाध्यक्ष अलीमोद्दीन कादरी, मुजीब पठाण, संजय शितळे, म. रफिक,शेख साजेद,सौरभ साकळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Related to this topic: