Kalamnuri Tiranga Yatra: 80 व्यां स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी शहरात एका भव्य-दिव्य ‘तिरंगा यात्रेचे’आयोजन करण्यात आले होते.
कळमनुरी (Kalamnuri Tiranga Yatra) : 80 व्यां स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी शहरात एका भव्य-दिव्य ‘तिरंगा यात्रेचे’आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. आमदार गजाननराव घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या यात्रेने संपूर्ण कळमनुरी शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळाले.
शहराचे ग्रामदैवत असलेल्या मोठा मारुती मंदिर परिसर येथून सकाळी १०:०० वाजता या तिरंगा यात्रेची अत्यंत उत्साही वातावरणात सुरुवात झाली. यात्रेच्या अग्रभागी मोठा तिरंगा ध्वज घेऊन चालणारे शालेय विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांमधील देशभक्तीचा जोश पाहण्यासारखा होता. ही भव्य तिरंगा यात्रा मोठा मारुती मंदिर परिसर येथून निघून खालील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, पोस्ट ऑफिस रोड, नवीन बस स्थानक (नांदेड-हिंगोली राज्य महामार्ग), राजमाता जिजाऊ चौक, या संपूर्ण मार्गावर नागरिकांकडून तिरंगा यात्रेचे व विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.
यात्रेचा (Kalamnuri Tiranga Yatra) समारोप कळमनुरी नगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ मोठ्या जल्लोषात करण्यात आला. या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांनी दिलेल्या "भारत माता की जय","वंदे मातरम" आणि "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या ओजस्वी घोषणांनी संपूर्ण कळमनुरी शहर दणाणून सोडले. समारोप प्रसंगी स्मारकाजवळ 'भारत माता पूजन' सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला.
प्रखर देशप्रेमाचा आणि ऐक्याचा संदेश
या (Kalamnuri Tiranga Yatra) तिरंगा यात्रेत कळमनुरी विधानसभेतील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या वेळी मा आ गजानन घुगे,ह भ प रामकिशन महाराज ठाकूर, ज्ञानेश महाराज, अंबादास कल्याणकर, सुरेशराव नागरे, महेश गोविंदवार, उमेश सोमानी, अशोक संगेकर,ओंकार नावडे, विठ्ठलराव भोयर, डॉ. सुधाकर लोमटे, एड . मनोज देशमुख, अँड. विठ्ठल माखणे , प्रा तिवारी सर ,नगरसेविका वर्षाताई राजू जाधव, वर्षाताई खंदारे, गजू पाटील बोंढारे, भागवत ठाकूर, कैलासराव शिंदे, हनुमंत सूर्यवंशी , अमिश दरक,नारायणराव डुरे, जिद्दी पाटील, योगेश सांगेकर,विक्रम शिंदे, विकास ठाकूर, राजू जाधव, इंदेश काबरा, कुणाल खरजुले,अनिल इंगळे, गणेश इंगोले,पारस मांडवगडे,रमेश पाठक,अजय वाढवे, राहुल मेने, अरुण कदम, गणेश कड,गणपत मुधळ, अशोक दांडेकर ,अमोल देशमुख, संदीप देशमुख, संदीप पतंगे, मसाराव करे, दौलत धनवे, राधाकृष्ण गुठ्ठे ,विजय निरगुडे ,उमेश सरकटे ,पवन असोले यांची प्रमुख उपस्थिती होती या यशस्वी आयोजनामुळे कळमनुरी शहरात राष्ट्रीय एकात्मतेचा आणि देशप्रेमाचा एकोपा पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आला.