Breaking News
  • सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र
  • आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद
  • धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अमेरिकेच्या दबावामुळे द्यावा लागला - शेतकरी नेते -राकेश टिकैत
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके
  • पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले
  • वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
  • पालघरच्या एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग
  • पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"
  • Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची विशेष सुनावणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी वकील संघ

उपविभागीय अधिकाऱ्यांविरोधात कळमनुरी वकील संघाचे तीव्र आंदोलन

Kalamnuri Bar Association: महसूल न्यायालयीन प्रकरणांच्या कामकाजादरम्यान वकिलांना कथितरीत्या अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत कळमनुरी वकील संघ


उपविभागीय अधिकाऱ्यांविरोधात कळमनुरी वकील संघाचे तीव्र आंदोलन

Kalamnuri Bar Association |

 

आठ दिवसांत मागणी मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा

कळमनुरी (Kalamnuri Bar Association) : महसूल न्यायालयीन प्रकरणांच्या कामकाजादरम्यान वकिलांना कथितरीत्या अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत कळमनुरी वकील संघाच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांच्याविरोधात ५ ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयासमोरजवळपास एक तास तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी वकिलांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

वकील संघाच्या (Kalamnuri Bar Association) पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, महसूल न्यायालयीन प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान वकिलांविरोधात अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक दिली जाते. तसेच पक्षकारांना, “प्रकरणात वकील नियुक्त करण्याची गरज नाही, पैसे वाया न घालवता मला येऊन भेटा,” अशा स्वरूपाचे कथित आदेश दिले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या वकिलांनी केला. या प्रकारामुळे वकिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, महसूल न्यायालयीन कामकाजाच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला.

आंदोलनानंतर कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांचे तात्काळ निलंबन करावे, त्यांच्या जागी महसुली प्रकरणे चालविण्यासाठी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच त्यांच्या कार्यकाळात आदेशित करण्यात आलेल्या सर्व महसूल न्यायालयीन प्रकरणांची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. वकील संघाच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आठ दिवसांनंतर कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वकील संघाच्या वतीने देण्यात आला.

कळमनुरी वकील संघाचे (Kalamnuri Bar Association) उपाध्यक्ष ॲड. सुनील घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ॲड. पी. डी. मोरे, ॲड. रवि शिंदे, ॲड. मनोज देशमुख, ॲड. डी. एस. पाईकराव, ॲड. एम. के. सय्यद, ॲड. मदन मुठाळ, ॲड. तातेराव देशमुख, ॲड. अझरुद्दीन कादरी, ॲड. उमेश जिंतूरकर, ॲड. शाकेर सिद्दिकी, ॲड. मो. एकबाल, ॲड. एस. एस. काळे, ॲड. एल. एल. शिरसाठ, ॲड. मुदस्सीर आश्रफी, ॲड. संतोष नरवाडे, ॲड. डी. पी. जाधव, ॲड. जी. एम. नागरे, ॲड. जे. आर. जाधव, ॲड. ए. बी. पतंगे, ॲड. ए. आर. दांडेकर, ॲड. व्ही. एच. खंदारे, ॲड. अविनाश काळे, ॲड. एम. के. खोकले, ॲड. शेख शकील, ॲड. जी. वाय. पतंगे, ॲड. पी. के. तडस, ॲड. राकेश मेहता, ॲड. टी. वाय. पवार यांच्यासह वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.