Kalamanuri Gram Panchayat: कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.राज्य निवडणूक आयोगाने सन २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या
आखाडा बाळापूर/ कळमनुरी (Kalamanuri Gram Panchayat) : कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.राज्य निवडणूक आयोगाने सन २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच चालू वर्ष २०२६ मध्ये मुदत संपणार्या आणि नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी. ग्राम पंचायत सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर.केला असून त्यानुसार कळमनुरी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आरक्षण १२ जुन रोजी नियुक्त अध्यासी अधिकारी .यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे.
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे विविध आदेश आणि (Kalamanuri Gram Panchayat) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील सुधारणांनुसार, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित जागा एकूण जागांच्या २७ टक्क्यांपर्यंत असतील. तसेच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांचे एकत्रित एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी या सोडतीत केली जाणार आहे.पूर्वी जाहीर झालेल्या काही अधिसूचना रद्द करून आता या नवीन नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवली जात आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पुढील महत्त्वाच्या तारखांना ही प्रक्रिया पार पडेल: ०८ जून सोमवार आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची नोटीस, सूचना जारी केली जाईल.१२ जून शुक्रवारी तहसीलदार जिवककुमार कांबळे यांनी प्राधिकृत केलेल्या अध्यासी अधिकार्याच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलावून प्रत्यक्ष आरक्षणाची सोडत एस्सी, एसटी, ओबीसी व महिला आरक्षणासह काढली जाईल. १७ जून बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेस (नमुना ब) जिल्हाधिकारी मान्यता देतील. १९ जून शुक्रवारी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप जाहीर केले जाईल.
१९ ते २५ जून गुरुवारी या कालावधीत नागरिकांना आरक्षणावर (Kalamanuri Gram Panchayat) आपल्या हरकती आणि सूचना तहसील कार्यालय कळमनुरी येथे दाखल करता येतील.०३ जुलै शुक्रवार प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी कळमनुरी आवश्यक तपासणी करून आपला अंतिम अभिप्राय नोंदवतील.
८ जुलै बुधवार उपविभागीय अधिकार्यांच्या अभिप्रायानंतर जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) मंजुरी देतील. १० जुलै शुक्रवार जिल्हाधिकार्यांनी मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला आणि आरक्षणाला व्यापक प्रसिद्धी दिली जाईल.निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे भयमुक्त, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची प्रक्रियेत ग्रामसेवकांपासून ते गटविकास अधिकारी कळमनुरी यांची राहील तसेच आरक्षण सोडतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवावी या करिता सदर माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
१२५ पैकी मुदत संपलेल्या १०९ ग्रामपंचयती आखाडा बाळापूर, शेवाळा, डोंगरकडा, जवळापांचाळ, सुकळीवीर, पोतरा,रूद्रवाडी, पिंपरी,आडा, डोंगरगावपुल, साळवा, येळेगाव, बोल्डा, चिखली, फुटाणा,बोथी, आसोला बाभळी, चाफनाथ, चुंचा, खरवड, माळेगाव,, कान्हेगाव, कडपदेव, मुंढळ, कोंढूर, कोपरवाडी, जांब, जामगव्हान, मोरवड, वाई, तरोडा, येडशी, सेलसुरा, रेडगाव, रेणापूर, शेनोडी, उमरदरावाडी, सिंदगी, सांडस, रामवाडी,सापळी, पाळोदी, बेलमंडळ, भाटेगाव, भोसी, कामठा, कवडी, दांडेगाव, दाभडी, खापरखेडा, जांभरून, नरवाडी, नवखा, निमटोक, तोंडापुर आदी १२५पैकी मुदत संपलेल्या १०९ ग्रामपंचायतचा समावेश आहे.