Breaking News
  • इंधन टंचाई: आता ॲपवर बुकिंग केल्यानंतरच मिळणार पेट्रोल-डिझेल
  • विधानसभा उमेदवाराच्या नावावर तब्बल 37 बँक खाती, 32 वाहने
  • 'भारत' जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत अव्वल
  • प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू; चाहत्यांना मोठा धक्का
  • शोच्या प्रीमियरपूर्वी प्रिया बापट, उमेश कामत यांनी अनुभवला अविस्मरणीय क्षण
  • इंधन टंचाईच्या अफवेने वाहनधारकांची प्रचंड धावपळ; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा
  • माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी: CM देवेंद्र फडणवीस
  • महाराष्ट्रात 12 वर्षांत 298 वाघांचा मृत्यू, न्यायालयाची कानउघाडणी; जबाबदार कोण?
  • आता होणार राडा..; 'झिम्मा ३'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच कमेंट्स

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन – विठ्ठल सरनाईक

“कलाशिक्षक हा केवळ संघटनांमध्ये अडकलेला नसून कलेचा खरा भुकेलेला असावा.


४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन – विठ्ठल सरनाईक

Kala Shikshan |

रिसोड (Kala Shikshan) : “कलाशिक्षक हा केवळ संघटनांमध्ये अडकलेला नसून कलेचा खरा भुकेलेला असावा. विद्यार्थ्यांपर्यंत विविध कला गुण पोहोचवण्याची जिद्द, निष्ठा आणि सृजनाची नशा जिवंत ठेवली तरच कलाशिक्षक खऱ्या अर्थाने जिवंत असल्याचे दिसून येते,” असे मत व्यक्त करत सर्व कलाशिक्षकांनी कोणत्याही संघटनेचा विचार न करता परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन कलाशिक्षक विठ्ठल सरनाईक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे आणि सातारा जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ मार्च २०२६ रोजी सातारा येथे ४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद सातारा येथे होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातील कलाशिक्षक, कलाकार आणि कलाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

शनिवार, २८ मार्च रोजी सकाळी १२:०० वाजता परिषदेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून खासदार ना. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी कला क्षेत्रातील मान्यवर अधिकारी, तज्ज्ञ आणि पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

दोन दिवसांच्या या परिषदेत कलाशिक्षकांसाठी वैचारिक आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्तरांवर समृद्ध कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. चित्रकार ओंकार पवार, सत्यजित वरेकर तसेच युवा शिल्पकार मंदार लोहार यांची थेट प्रात्यक्षिके पाहण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. “रंगरेषा ते डिझाईन : सृजनात्मक प्रवास” आणि “नवीन शैक्षणिक धोरणातील (NEP) कलाशिक्षणाचे स्थान” या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि चर्चासत्रे होणार आहेत.
याशिवाय कला क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, जागतिक स्तरावरील आर्ट स्टुडिओंची माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांना सृजनशीलतेकडे वळविण्याचे मार्ग यावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व कलाध्यापकांचा गौरव सोहळा हे या परिषदेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ४:०० वाजता परिषदेचा समारोप होणार असून यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील, शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर तसेच पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परिषदेच्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, निसर्गचित्र स्पर्धा, तसेच कलाशिक्षकांसाठी खुला मंच अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे राज्याध्यक्ष नरेंद्र बाराई यांनीही या परिषदेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर कलाशिक्षणाचे स्थान आणि कलाशिक्षकांचे भविष्य यावर या परिषदेत सखोल मंथन होणार आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त कलाशिक्षक, कलाकार आणि कलाप्रेमींनी या परिषदेत सहभागी व्हावे.
या भव्य परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सातारा जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष उमेश देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडून विशेष परिश्रम घेतले जात आहेत.