Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जवळा बाजार समिती

जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांना १५ वर्षानंतर नियमित वेतन सुरू

Javla Bazar Market Committee: विनोदराव अंभोरे यांनी जुनी कमिटी करमचारांना नियमित वेतन सुरू केले, ड्रेस कोड लागू व ओळखपत्र वाटून घेतल आहे. भविष्य निधीचा व्यवस्था करला गेला.


जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांना १५ वर्षानंतर नियमित वेतन सुरू 

Javla Bazar Market Committee |

 

ड्रेस कोड व ओळखपत्राचे वाटप; भविष्य निर्वाह निधी व अंशदानाचा बाजार समितीकडून भरणा

जवळा बाजार (Javla Bazar Market Committee) : गत दशकभरापासून नियमित वेतना ऐवजी ॲडव्हान्सच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची सुटका झाली असून सभापती विनोदराव अंभोरे यांनी कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित वेतन देणे सुरू केले आहे.
   
सभापती म्हणून विनोदराव अंभोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सेवाशर्तीनुसार मन लावून काम करण्याचे आवाहन करतानाच आर्थिक बेशिस्त खपवून घेणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार बाजार समिती कर्मचाऱ्यांनी नियमित वसुली करून कामाची चुणूक दाखवली. त्यामुळे सभापती विनोदराव अंभोरे यांनी बाजार समिती कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करून ओळखपत्राचे वाटप केले.
     
बाजार समिती कर्मचाऱ्यांचे मागील अनेक वर्षातील थकीत वेतन वाटप करून नियमित वेतन अदा करणे सुरू केले आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी व अंशदानाची रकमेचा भरणा बाजार समितीकडून करण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मदनराव कऱ्हाळे यांच्या काळात कर्मचाऱ्यांचे दरमहा नियमित वेतन सुरू होते. त्यानंतर नियमित वेतन सुरू होण्यास सभापतीपदी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच सभापती यावा लागला ही भावना कर्मचारी वर्गात असल्याचे दिसून आले.