Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Janakrosh Morcha

E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर नागपुरात युवक काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; नितीन गडकरींच्या निवासस्थानाबाहेर तणाव

E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून नागपुरात राजकीय वातावरण तापले असून शहर युवक काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले.


e20 पेट्रोलच्या मुद्द्यावर नागपुरात युवक काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा नितीन गडकरींच्या निवासस्थानाबाहेर तणाव

चिटणीस पार्क चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त; आंदोलकांची धरपकड, पोलिस आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष

E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून नागपुरात राजकीय वातावरण तापले असून शहर युवक काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले. मोर्चादरम्यान चिटणीस पार्क चौक परिसरात पोलीस आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की व संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली.

हा मोर्चा महाल येथील काँग्रेस कार्यालय देवडिया भवन येथून सुरू होऊन चिटणीस पार्क चौक मार्गे थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स उभारण्यात आले होते.

आंदोलनापूर्वी युवक काँग्रेसने प्रचारासाठी पोस्टर प्रसिद्ध केले होते. या पोस्टरमध्ये "धर्मेंद्र प्रधान तो झांकी है... नितीनजी अभी बाकी है!" असा उल्लेख करण्यात आला होता, ज्याची राजकीय वर्तुळातही चर्चा झाली.

मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलकांची धरपकड सुरू झाली. यावेळी पोलीस आणि काँग्रेस पदाधिकारी आमनेसामने आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि जोरदार संघर्ष पाहायला मिळाला.

E20 इंधनाच्या वापरामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा दावा अनेकांकडून केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे आंदोलन छेडले आहे. याच मुद्द्यावरून पक्षाने आक्रमक भूमिका घेत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेर जनआक्रोश मोर्चा काढला. त्यामुळे परिसरात काही काळ हायव्होल्टेज राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या.

Related to this topic: