Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जामदया शिवारातील खुनाचे गूढ उकलले

जामदया शिवारातील खुनाचे गूढ उकलले..

Sachin Rajguru Death: सेनगावमध्ये तरुणाचा निर्घृण खून; चेहरा विद्रुप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न. टॅटूच्या आधारे 12 तासांत ओळख पटवण्यात यश, सचिन राजगुरूचे नाव उघड.


जामदया शिवारातील खुनाचे गूढ उकलले

Sachin Rajguru Death |

टॅटूच्या आधारे सचिन राजगुरूची ओळख पटवण्यात यश

सेनगाव (Sachin Rajguru Death) : तालुक्यातील जामदया शिवारातील उमरदरी पाटी जवळ एका तरुणाचा निर्घृण खून करून ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, नराधमांच्या क्रौर्यावर पोलिसांनी मात केली असून, मृताच्या हातावरील ‘एaम्प्ग्ूa’ आणि ‘श्दस् Da्’ या टॅटूंच्या आधारे अवघ्या १२ तासांत त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. (Sachin Rajguru Death) सचिन रामकिशन राजगुरू (रा. वडव, ता. लोणार) असे मृताचे नाव असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

८ एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रकाश चव्हाण यांच्या शेताजवळील नाल्यात उमरदरी पाटीजवळ एक (Sachin Rajguru Death) मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून सेनगाव पोलिसांनी तातडीने धाव घेतली. आरोपींनी सचिनच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची हत्या केली होती आणि त्याची ओळख पटू नये यासाठी चेहर्‍याचा अक्षरशः चेंदामेंदा केला होता. हा केवळ खून नसून थंड डोक्याने रचलेला एक कट होता, असे घटनास्थळावरील दृश्यावरून स्पष्ट होत होते. चेहरा विद्रुप झालेला असतानाही पोलिसांनी मृताच्या शरीरावरील खुनांकडे लक्ष केंद्रित केले. सचिनच्या एका हातावर ‘एaम्प्ग्ूa’ आणि पाउलाचे एक टॅटू, तर दुसर्‍या हातावर आई-वडिलांच्या आठवणीत ‘श्दस् Da्’ आणि कुटुंबाचे चित्र रेखाटलेले होते. याच खुनाची माहिती सोशल मीडिया आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून फिरवल्यानंतर, हा मृतदेह लोणार तालुक्यातील वडव येथील सचिन रामकिशन राजगुरूचा असल्याचे निष्पन्न झाले. सचिन (Sachin Rajguru Death) हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. सोलर प्लेट बसवण्याचे काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. वैयक्तिक कारणांमुळे पत्नीपासून दूर राहत असलेल्या सचिनला एक लहान मुलगीही आहे. आईचा आधार आणि बहिणीचा लाडका भाऊ असलेल्या सचिनचा असा करुन अंत झाल्याचे समजताच वडव गावावर शोककळा पसरली आहे. 

पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले आणि सपोनि दीपक मस्के यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हालवली आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, पोलिसांनी तीन पथके तयार करून आरोपींच्या शोधार्थ लोणारकडे रवाना केली आहेत. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस निरीक्षक मोहन भोसले,पोउनी दिलीप मोरे, सपोनि दीपक मस्के, जीवन मस्के, सोमनाथ राठोड, अमोल चिकने व इतर सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. सेनगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपी जेरबंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मयत सचिन राजगुरू याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रूग्णालयात गुरूवारी करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मयत सचिन राजगुरू याच्या पश्चात आई, बहिण, एक लहान मुलगी असा परिवार आहे.