Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

जांभोरा येथील पाझर तलावाची दुरुस्ती रखडली; पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील गावालगत असलेला पाझर तलाव फुटून आठ महिने उलटले, तरी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.


जांभोरा येथील पाझर तलावाची दुरुस्ती रखडली पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

Jambhora Dam |

निधी उपलब्ध, निविदा प्रक्रिया पूर्ण; तरीही कामाला मुहूर्त मिळेना..!

सिंदखेडराजा (Jambhora Dam) : सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील गावालगत असलेला पाझर तलाव फुटून आठ महिने उलटले, तरी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, प्रशासकीय दिरंगाईमुळे यावर्षीही शेतीचे नुकसान होणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

गेल्यावर्षी १७ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद सिंचन विभागाचा हा पाझर तलाव फुटला होता. या दुर्घटनेत परिसरातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तलाव फुटल्यामुळे सिंचनाचा प्रश्न तर निर्माण झालाच, पण आगामी पावसाळ्यात पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तलावाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला असून निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मात्र, तरीही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 'आपल्या मर्जीतील' कंत्राटदाराला काम देण्यासाठी हे प्रकरण रखडवले जात असल्याची चर्चा परिसरात आहे. पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत काम सुरू झाले तरी ते वेळेत पूर्ण होईल का?

घाईघाईत केल्या जाणाऱ्या कामाच्या दर्जाबाबत शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. यासंदर्भात दैनिक देशोन्नतीने जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही

प्रशासकीय संभ्रम:

निविदा प्रक्रिया होऊनही काम का थांबले आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही.जबाबदार अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन, पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावाची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी जांभोरा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

"तलाव फुटल्यामुळे आमचं आधीच मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा पावसाळा येतोय, पण प्रशासनाला जाग आलेली नाही. या तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती झाल्यास तलाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार - रमेशराव खरात स्थानिक शेतकरी, जांभोरा

Related to this topic: