Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जल जीवन मिशन

जल जीवन मिशन आढावा बैठकीमध्ये टंचाईग्रस्त गावांत पाणी पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करा

Jal Jeevan Mission: हिंगोली जिल्ह्यातील जल जीवन मिशन आढावा बैठकीमध्ये सीईओ विवेक गायकवाड यांनी टंचाईग्रस्त गावांसाठी पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.


जल जीवन मिशन आढावा बैठकीमध्ये टंचाईग्रस्त गावांत पाणी पुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करा

Jal Jeevan Mission |

सीईओ विवेक गायकवाड यांचे आदेश

हिंगोली (Jal Jeevan Mission) : जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता, ज्या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तिथे केवळ टँकरवर अवलंबून न राहता तातडीने पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी  ३ एप्रिल शनिवार रोजी दिले आहेत. जिल्हा परिषद येथील सभागृहात आयोजित जल जीवन मिशन व 'पाणी पुरवठा विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते.

​यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी  समृद्धी दिवाने, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजू नरवाडे आदींची  उपस्थित होती.टंचाई आराखडा मध्ये ​ २२ गावांना २८ टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे परंतु अध्याप एकाही गावाला टँकर द्वारे (Jal Jeevan Mission) पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता भासली नाही, यावर भाष्य करताना सीईओ गायकवाड म्हणाले की, टँकर हा शेवटचा पर्याय असावा. जिथे अत्यंत आवश्यक आहे तिथेच टँकर वापरा, मात्र इतर ठिकाणी कायमस्वरूपी पाणीपुरवठा कसा होईल यावर भर द्या.
​रोजगारावर होतोय परिणाम ​पाणी टंचाईचा सामाजिक परिणाम अधोरेखित करताना गायकवाड यांनी चिंता व्यक्त केली. 

ते म्हणाले, अनेक गावांत महिलांना पाण्यासाठी ३-४ तास खर्च करावे लागत आहेत. यामुळे त्यांचा वेळ वाया जाऊन त्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. जनतेला शुद्ध आणि वेळेवर पाणी मिळणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांची परवड थांबवण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे.सर्व  कोरडे पडलेले स्त्रोत हे  जल तारा उपक्रमांतर्गत पुनरुज्जीवित करावेत. हे काम मिशन मोडवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

​कनिष्ठ अभियंत्यांनी  नियोजन करून प्रत्यक्ष गावात जाऊन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करावी व गाव नकाशा तयार करून गावातील सर्व पाणी स्त्रोत रेखांकन करून १५ दिवसात गाव नकाशे तयार करण्याचे  आदेश दिले व संभाव्य पाणी टंचाई च्या अनुषंगाने करावयाच्या आवश्यक तरतुदीची  माहिती अद्यावत करण्याचे निर्देश दिले. दोषी कंत्राटदारांवर कारवाई: जल जीवन मिशन अंतर्गत जे कंत्राटदार कामचुकारपणा करत आहेत किंवा कामे अपूर्ण ठेवत आहेत, त्यांना तातडीने नोटिसा बजावून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. 

​पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि नागरिकांना पाणी बचतीची सवय लावावी. कृती आराखडा पुढील चार महिने टंचाई भासणार नाही, या दृष्टीने 'पूरक पाणी टंचाई कृती आराखडा' तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. ​येत्या उन्हाळ्यात जनतेला (Jal Jeevan Mission) पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. ५० टक्क्यांच्या खाली असलेल्या योजनांचा तालुका आणि गाव निहाय आढावा घेऊन त्या योजना तातडीने कार्यान्वित करण्याचा अनुषंगाने  सर्व संबंधितानी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश  दिले.

Related to this topic: