Girgaon Indian Army: वसमत तालुक्यातील गिरगाव येथील तीन तरुणांची इंडियन आर्मी मध्ये झाल्याने लष्करी वर्दीचा स्वाभिमान ठरले आहेत. गिरगावच्या मातीने आजवर अनेक कर्तृत्ववान माणसे दिली आहेत, इतिहास रचला
हिंगोली (Girgaon Indian Army) : वसमत तालुक्यातील गिरगाव येथील तीन तरुणांची इंडियन आर्मी मध्ये झाल्याने लष्करी वर्दीचा स्वाभिमान ठरले आहेत. गिरगावच्या मातीने आजवर अनेक कर्तृत्ववान माणसे दिली आहेत, पण आज जो इतिहास रचला गेला आहे, त्याने प्रत्येक गिरगावकराची छाती अभिमानाने फुलून आली आहे. ज्यामध्ये संभाजी माधवराव कऱ्हाळे , विजय सोपान राठोड, आणि सतीश बालाजी नादरे या गिरगावच्या तीन सुपुत्रांनी भारतीय लष्करामध्ये (Indian Army) एकाच वेळी स्थान मिळवून संपूर्ण गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
संकटांवर मात करत गाठले ध्येय
या (Girgaon Indian Army) तिन्ही तरुणांचा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत सामान्य, शेतकरी आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या या मुलांनी परिस्थितीचे कधीच भांडवल केले नाही. शेतात घाम गाळणाऱ्या आई-वडिलांचे कष्ट त्यांनी जवळून पाहिले होते. घरातली गरिबी आणि सोयी-सुविधांचा अभाव यावर त्यांनी केवळ आणि केवळ आपल्या जिद्दीच्या, कष्टाच्या आणि अखंड परिश्रमाच्या जोरावर मात केली. पहाटेच्या अंधारात गावाकडच्या रस्त्यांवर धावण्यापासून ते लेखी परीक्षेच्या तयारीसाठी रात्रीचा दिवस करण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास आज खऱ्या अर्थाने फळाला आला आहे.
खरंतर गिरगावकरांसाठी ऐतिहासिक आणि सुवर्णक्षण
एकाच गावातून, एकाच वेळी तीन तरुणांची भारतीय सैन्य दलात निवड होणे ही अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. ही केवळ या तीन कुटुंबांची यशोगाथा नाही, तर संपूर्ण गिरगावचा हा सामूहिक गौरव आहे. (Girgaon Indian Army) देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून, परिस्थितीला आव्हान देत ज्यांनी हा टप्पा गाठला, ते आज संपूर्ण परिसरातील युवा पिढीसाठी आदर्श बनले आहेत."
वीर सुपुत्रांना आणि माता-पित्यांना मानाचा मुजरा!
संभाजी माधवराव कऱ्हाळे ,विजय सोपान राठोड, आणि सतीश बालाजी नादरे तुम्हा तिघांचेही हे यश थक्क करणारे आहे. ज्या (Girgaon Indian Army) हातांनी शेतात राबून अन्न पिकवले, त्याच हातांचे सुपुत्र आज सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करणार आहेत. यापेक्षा मोठा आनंद आणि समाधान एका शेतकरी बापासाठी आणि गावासाठी दुसरे काय असू शकते?
तुमच्या या दैदिप्यमान यशाबद्दल तुमचे, तुम्हाला घडवणाऱ्या तुमच्या कष्टकरी आई-वडिलांचे आणि संपूर्ण गिरगावचे मनःपूर्वक अभिनंदन तुमची ही देशसेवेची नवी इनिंग अभिमानास्पद ठरो अशा शुभेच्छा गावकऱ्यांनी यावेळी दिल्या.