Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

अंगणवाडी अर्धवट बांधकाम

१९ लाखांचा खर्च, तरीही अंगणवाडी अर्धवटच; चिमुकल्यांचे हाल, प्रशासनावर सवाल

Anganwadi construction: अंगणवाडीचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्णच असून, यामुळे लहान बालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊनही


१९ लाखांचा खर्च तरीही अंगणवाडी अर्धवटच चिमुकल्यांचे हाल प्रशासनावर सवाल

Anganwadi construction |

कोरची ( Anganwadi construction) : तालुक्यातील बोगाटोला ग्रामपंचायत अंतर्गत खुर्शीपार येथील अंगणवाडीचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्णच असून, यामुळे लहान बालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊनही काम रखडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अंगणवाडीत सध्या एकूण ३७ लाभार्थी असून, त्यामध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील २१ मुले, ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील ११ बालके तसेच ० ते ६ महिन्यांतील ५ बालके यांचा समावेश आहे. अपूर्ण बांधकामामुळे या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंगणवाडी सेविका सौ. अस्मिता सुभाष ताडामी (खुर्शीपार) व मदतनीस सौ. दुलमा गंगाराम मडावी यांनी सांगितले की, जुनी इमारत पावसाळ्यात गळत असून नवीन इमारतीच्या स्लॅबचे पोफडे निघाले आहेत. स्लॅबमध्ये तडे पडल्याने पावसाचे पाणी थेट आत येते, त्यामुळे मुलांना बसण्यासाठी जागा राहत नाही. परिणामी शिक्षण व संगोपनावर परिणाम होत आहे.

या अंगणवाडी इमारतीसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना (नरेगा) अंतर्गत १९,१२,७२२ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी बांधकाम साहित्य पुरवठादार आर. व्ही. बांगडकर यांना ५६,१७० रुपये, तर मजुरांना १,४०,३५० रुपये मस्टरद्वारे अदा करण्यात आले आहेत. हे काम ग्रामसेवकांनी कोरची येथील कंत्राटदार  अग्रवाल यांना दिल्याची माहिती आहे. सन २०२३-२४ मध्ये मंजुरी देऊन काम सुरू करण्यात आले, मात्र आजतागायत बांधकाम पूर्ण झालेले नाही.

दरम्यान, ग्रामसेवक लाकडे यांनी जुनी अंगणवाडी इमारत सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. मात्र मग तब्बल १९ लाख रुपये खर्च करून नवीन इमारतीची आवश्यकता काय होती? आणि आवश्यकता होतीच तर निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण का करण्यात आले नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

शासनाने नरेगा अंतर्गत कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले असतानाही संबंधित कंत्राटदाराकडून काम पूर्ण न झाल्याने अंगणवाडीतील चिमुकल्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.