Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Illegal Sand Transportation

जिल्हा सीमेवर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा एलसीबीच्या ताब्यात; 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड–हिंगोली जिल्हा सीमेवरील वरूड तांडा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिस पथकाने कारवाई केली.


जिल्हा सीमेवर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा एलसीबीच्या ताब्यात 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड–हिंगोली जिल्हा सीमेवरील वरूड तांडा शिवारात रात्री उशिरा कारवाई; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

आखाडा बाळापूर : नांदेड–हिंगोली जिल्हा सीमेवरील वरूड तांडा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिस पथकाने कारवाई केली. या कारवाईत वाहन आणि 5 ब्रास वाळू असा एकूण 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी 11 जुलै रोजी पहाटे एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचा उपसा करून हायवा टिप्परच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात वाहतूक केली जात असल्याची माहिती होती. त्यानुसार 10 जुलै रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने नांदेड–हिंगोली जिल्हा सीमेवरील वरूड तांडा शिवारात कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा टिप्पर पकडला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि एलसीबी पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत एलसीबी पोलिस उपनिरीक्षक माधवराव जिव्हारे, भुजंग कोकरे, हरिभाऊ गुंजकर, आजम प्यारेवाले, हराळ, मिरे, सावंत आणि खंडागळे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

पोलिसांनी हायवा टिप्पर आणि त्यातील 5 ब्रास वाळू असा एकूण 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी भुजंग कोकरे यांच्या फिर्यादीवरून प्रज्वल सदाशिव दुधमल, रा. धानोरा मोत्या, ता. पूर्णा याच्याविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात कलम 303(2) BNS सह कलम 48(7)(8) गौण खनिज अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकडा पोलिस चौकीचे बीट प्रमुख संतोष नागरगोजे करीत आहेत.

Related to this topic: