Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

सिद्धेश्वर नाल्यातून रेतीची अवैध वाहतूक, महसूल विभागाच्या दुर्लक्षाचा आरोप

राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वरनाल्यातून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


सिद्धेश्वर नाल्यातून रेतीची अवैध वाहतूक महसूल विभागाच्या दुर्लक्षाचा आरोप

Illegal Mining |

दररोज सकाळी ट्रॅक्टरद्वारे रेती चोरी

राजुरा (Illegal Mining) : राजुरा तालुक्यातील सिद्धेश्वरनाल्यातून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर नाल्याचा काही भाग वन विभागाच्या हद्दीत येतो. येथून रेती वाहात ती पुढे महसूल विभागाच्या हद्दीत येते आणि तीच सुपीक रेती तेथून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैधरित्या वाहतूक केली जाते. दररोज पहाटेच्या सुमारास चार ते पाच ट्रॅक्टरद्वारे रेतीची ने-आण केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे ही वाहतूक नियमितपणे होत असतानाही संबंधित विभागांकडून ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महसूल विभाग यांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. या अवैध उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला असून नाल्याच्या प्रवाहावर परिसरातील जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांकडून कारवाईची मागणी

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देऊन रेती चोरी रोखण्यासाठी कडक कारवाई करावी, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.

Related to this topic: