Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

घरगुती गॅस गुन्हा

परभणीत ऑटो व अन्य वाहनांत घरगुती गॅस भरून देणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Domestic Gas Crime: गंगाखेड शहरात घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसचा व्यवसायिक वापर करून ऑटो व अन्य वाहनांत गॅस भरून देणाऱ्या एका महिलेविरुद्ध बुधवार रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस


परभणीत ऑटो व अन्य वाहनांत घरगुती गॅस भरून देणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Domestic Gas Crime |

 

१४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

परभणी (Domestic Gas Crime) : गंगाखेड शहरात घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसचा व्यवसायिक वापर करून ऑटो व अन्य वाहनांत गॅस भरून देणाऱ्या एका महिलेविरुद्ध बुधवार रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन गॅस टाकीसह गॅस भरण्याची मशीन व वजन काटा असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील दत्त मंदिर, रमजान नगर परिसरात असलेल्या पत्राच्या शेडमध्ये एक महिला घरगुती वापराचा गॅस ऑटो व इतर वाहनांत भरून देत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक युसूफ पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर रेंगे पाटील, पोलीस हवालदार संतोष मोहळे, पोलीस शिपाई परसराम परचेवाड आदींच्या पथकाने बुधवार ३ जून रोजी सायंकाळी ७:१० वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा मारला असता पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या गॅस टाकीसह गॅस भरण्याची मशीन व वजन काटा असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीसांनी तेथे उपस्थित सिता राजेंद्र मेंडके नामक महिलेस ताब्यात घेतले. व घरगुती वापराची भारत पेट्रोलियम कंपनीची एलपीजी गॅस टाकी, वाहनात गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी मशीन तसेच वजन काटा असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस हवालदार संतोष मोहळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिता राजेंद्र मेंडके यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ अन्वये गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपाली गित्ते करीत आहेत.

गॅसचा गैरवापर करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी

गेल्या काही महिन्यात गॅस सिलिंडरच्या (Domestic Gas Crime) पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्याने शहरातील गॅस एजन्सींसमोर गॅस कार्डधारक ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. अशा परिस्थितीत घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅसचा वाहनांमध्ये वापर होत असल्याचा प्रकार पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे उघडकीस आल्याने नागरिकांतुन आश्चर्य व्यक्त करत घरगुती गॅसचा गैरप्रकार करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.