Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीतील नानलपेठ हद्दीत अवैध दारू वाहतुकीवर स्थागुशाचा छापा

शहरातील नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीतील जेल कॉर्नर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध देशी दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले.


परभणीतील नानलपेठ हद्दीत अवैध दारू वाहतुकीवर स्थागुशाचा छापा

Illegal Liquor |

शहरातील जेल कॉर्नर परिसरात कारवाई; दोन आरोपींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त

परभणी (Illegal Liquor) : शहरातील नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीतील जेल कॉर्नर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध देशी दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत देशी दारूच्या १९२ बाटल्या व मोटारसायकल असा एकूण ९५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीतसिंग बिनासिंग टाक (वय ३५, रा. साकला प्लॉट, परभणी) व किरण किशोर पाष्टे (वय ४८, रा. हडको, नूतन कॉलनी, परभणी) हे दोघेही होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एमएच २२ एएस १३१२ वरून विनापरवाना देशी दारूची चोरटी विक्री करण्यासाठी वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने जेल कॉर्नर परिसरात सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली.

यावेळी आरोपींकडून भिंगरी संत्रा १८० एमएलच्या १९२ बाटल्या किंमत १५ हजार ३६० रुपये व ८० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ९५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी नानलपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी जगताप, पोउपनि. परिहार, सय्यद उमर, पांगरकर, प्रवीण घोंगडे, रफीयोद्दीन शेख व प्रमोद पुरी यांनी संयुक्तपणे केली.

अवैध दारूवर आणखी एक छापा; दारू साठा जप्त

बुधवार, २० मे रोजी परभणी शहरातील नानलपेठ हद्दीत तुकाराम प्रभाकर पाईकराव (वय ४५, रा. शाहू नगर, परभणी) हे पाथरी रोड, शाहू नगर येथे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत आरोपीसह १७ हजार ९३० रुपयांची अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नानलपेठ पोलिस करत आहेत. सदरची कारवाई स्थागुशाच्या पथकाने केली.

Related to this topic: