Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीत अवैध दारूविरोधात मोठी कारवाई; ५५ जणांवर गुन्हे, ४.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे जिल्ह्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यभर सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री आणि हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई केली आहे


हिंगोलीत अवैध दारूविरोधात मोठी कारवाई ५५ जणांवर गुन्हे ४९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal Liquor Raid |

हिंगोली (Illegal Liquor Raid) : पुणे जिल्ह्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्यभर सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री आणि हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई केली आहे. २९ मे ते ११ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत ५५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सूचनेनुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य गो. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान अवैध मद्य विक्री, वाहतूक तसेच हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर धडक कारवाई करण्यात आली.

कारवाईत देशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या ८०० बाटल्या, विदेशी मद्याच्या ९ बाटल्या, १८४ लिटर हातभट्टी दारू, ७१० लिटर रसायन तसेच ९ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ९० हजार ३६० रुपये असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत संबंधित ५५ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध मद्य खरेदी किंवा सेवन न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास ०२४५६-२२१०१६, टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

विशेष मोहीम सुरूच

विषारी दारूच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाभरात अवैध मद्यविरोधी कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

Related to this topic: