Illegal cattle slaughter: कुपटा येथे गोवंशाची अवैध हत्या करून अवशेष फेकले गेले. विश्व हिंदू परिषदेने ठाणेदारांना कठोर कारवाई करण्याची मागणी केली. गोवंश तस्करी, अवैध कत्तल
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी, ठाणेदार यांना निवेदन
मानोरा (Illegal cattle slaughter) : मानोरा तालुक्यातील कुपटा येथे दि. ३० मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध हत्या करून अवशेष फेकण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याप्रकरणी विश्व हिंदू परिषद - बजरंग दल, मानोरा प्रखंडच्या वतीने ठाणेदार नैना पोहेकर यांना दि. ४ जून रोजी निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुपटा येथे गोवंशाची अवैध हत्या (Illegal cattle slaughter) करून त्याचे अवशेष फेकण्यात आले. ही अत्यंत गंभीर व संतापजनक घटना आहे. सदर प्रकरणाची तात्काळ व सखोल चौकशी करून घटनेत सहभागी असलेल्या सर्व दोषींना शोधून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. मानोरा तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी, अवैध कत्तल व गोमांस वाहतुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा घटनांमुळे समाजातील विविध घटकांच्या भावना दुखावल्या जात असून सामाजिक सलोखा व शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे सदर प्रकरणासह तालुक्यात सुरू असलेल्या गोवंश तस्करी, अवैध कत्तल (Illegal cattle slaughter) व गोमांस वाहतुकीची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करावेत व कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा समाज विघातक कृत्यांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. निवेदन देतेवेळी पदाधिकारी राम हेडा, करण ठाकुर, मनोज डांबरे, क्रिस राठोड, सचिन पडघान, वेदांत तिवारी, अनुपम पद्मगीरवार, विवेक रत्नपारखी, सचिन काळे आदीसह इतरांची उपस्थिती होती.