Breaking News
  • पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल
  • रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
  • आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय, चारही पूल गेले पाण्याखाली
  • मुंबई, पुणे परिसरात पुढील 2 दिवस रेड अलर्ट
  • मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी
  • कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन विलंबाने; मुसळधार पावसाचा फटका
  • मावळमध्ये एनडीआरएफची धाडसी कारवाई; पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची सुखरूप सुटका
  • साताऱ्यात सुसाट्याच्या वाऱ्याने शाळेचे छप्पर उडाले
  • पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्था

हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचा चेंज रिपोर्ट फेटाळला..

Hutatma Bahirji Memorial Shikshan Sanstha:वसमत तालुक्यातील हुतात्मा बहिरज शिक्षण संस्थेची नोकरी भरती आणि धोरणाच्या बदलासंबंधी धार्मिक आयुक्तांनी रिपोर्ट माफ करून नाकारल्यामुळे एकदा पुन्हा बेकायदेशीरता


हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचा चेंज रिपोर्ट फेटाळला

Hutatma Bahirji Memorial Shikshan Sanstha |


सोपानराव नादरे पुन्हा एकदा ठरले भारी
बेकायदेशीर संचालक मंडळाने घेतलेले निर्णय नोकर भरती संकटात

वसमत (Hutatma Bahirji Memorial Shikshan Sanstha) : वसमत तालुक्यातील हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेच्या  निवडणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. धर्मादाय आयुक्तांनी मार्च 2026 मध्ये दाखवलेली निवडणूक अवैध ठरवून  मंडळाच्या बदल अहवाल चेंज रिपोर्टला मान्यता देण्यास नकार दिला आहे त्यामुळे बेकायदेशीर ठरलेल्या मंडळांने घेतलेले निर्णय वैध की अवैध असा प्रश्न आहे. 2012 पासून संस्थेचा एकही चेंज रिपोर्ट मान्य झालेला नाही.  त्यामुळे नोकरभरती व इतर निर्णय वादात सापडले आहेत संस्थेचे सचिव म्हणून शिक्कामोर्तब  झालेले सोपानराव नादरे हे न्यायालयीन लढाईत पुन्हा एकदा भारी ठरले असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेची निवडणूक एक मार्च 2026 मध्ये घेतल्याचे दाखवण्यात आले होते.  2026 ते 2031 या कालावधीसाठी संचालक मंडळाचा बदल अहवाल चेंजरिपोर्ट सहाय्यकधर्मादाय आयुक्त कार्यालयात संस्थेच्या वतीने पंडितराव देशमुख यांच्या माध्यमातून सादर करण्यात आला होता या बदल अहवालास संस्थेचे सचिव सोपानराव नादरे, केशवराव नादरे यांनी आक्षेप घेतला होता.

 हिंगोली येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या नव्या निवडणुकी संदर्भातील बदल अहवालाला तात्पुरती मान्यताही नाकारली आहे. 3 जुलै 2026 रोजी दिलेल्या या आदेशामुळे  संस्थेचा कारभार कायदेशीर की बेकायदेशीर असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे 2012 पासून संस्थेच्या निवडणुका वादग्रस्त ठरत आहेत. यापूर्वी झालेल्या निवडणुकींना सोपानराव नादरे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते त्यात सोपानराव नादरे यांना सचिवपदी कायम करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मार्च 2026 मध्ये संस्थेची निवडणूक घेऊन चेंजरिपोर्ट सादर करण्यात आला होता. नव्याने झालेल्या निवडणुकीच्या बदल अहवालालाही तात्पुरती मान्यता नाकारण्यात  आली आहे.

न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे की, चौकशी क्रमांक 149/2026 मधील बदल अहवाल प्रथमदर्शनी कायदेशीर व वैध वाटत नाही. त्यामुळे त्या बदल अहवालाला तात्पुरती मान्यता देण्यास कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे नमूद करून अर्ज फेटाळण्यात आला. संस्थेच्या सचिवांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की, 10 मार्च 2026 रोजी निवडणूक झाली असून संस्था जिल्ह्यात 12 शैक्षणिकसंस्था चालवित असल्याने प्रशासन, शासनाच्या विविध मान्यता, धोरणात्मक निर्णय आणि दैनंदिन कामकाजासाठी तात्पुरती मान्यता आवश्यक आहे. मात्र सोपानराव नादरे यांच्या वतीने वकिलांनी केलेला युक्तिवाद, कागदपत्रे आणि उपलब्ध नोंदींचा विचार करून न्यायालयाने संस्थेच्या वतीने मांडलेले म्हणणे स्वीकारले नाही व त्यांनी केलेली मागणी फेटाळून लावली.
 
हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेतील प्रत्येक नवीन निवडणुकीनंतर बदल अहवाल दाखल झाला; परंतु आधीचा बदल अहवाल अंतिम निकाली निघण्यापूर्वी पुढील निवडणूक झाल्याने नवीन बदल अहवाल दाखल करण्याची वेळ आली. परिणामी एकामागोमाग एक बदल अहवाल प्रलंबित राहिले. यामुळे कायदेशीरदृष्ट्या संचालक मंडळ बेकायदेशीर ठरले बेकायदेशीर मंडळाच्या माध्यमातून आज पर्यंत झालेला कारभार झालेली नोकर भरती कायदेशीर की बेकायदेशीर हा पेच कायमच आहे. धर्मादाय आयुक्तांनी  मार्च महिना झालेल्या निवडणुकीच्या चेंज रिपोर्टला तात्पुरती मान्यता नाकारल्याने व्यवस्थापन समिती अवैध ठरली आहे संस्थेच्या नोकर भरती, खरेदी, दैनंदिन कारभार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णयासंदर्भात कायदेशीर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. संचालक मंडळाच्या चेंज रिपोर्टलाच मान्यता मिळाली नसल्याने आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जयप्रकाश दांडेगावकर विरुद्ध सोपानराव नादरे संघर्ष

हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेच्या (Hutatma Bahirji Memorial Shikshan Sanstha) निमित्ताने माजी सहकारमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व संस्थेचे सचिव सोपानराव नादरे त्यांचा सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. 2012 पासून संस्थेच्या चेंज रिपोर्टला मान्यता नाही त्यामुळे संस्थेचे आतापर्यंतचे सर्व निर्णय बेकायदेशीर ठरतात न्यायालयाचे निर्णय काहीही लागले असले तरी संस्थेवर जयप्रकाश दांडेगावकर यांचा कायम ताबा आहे हे सर्वश्रुत आहे. मात्र सोपानराव नादरे यांनी कायदेशीर लढाईद्वारे आपले स्थान बळकट केले असून या लढाईत सोपानराव नादरे हे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे.

कायदेशीर गुन्हे नोंदवणार सोपानराव नादरे यांचा इशारा

या संदर्भात संस्थेचे सचिव तथा ज्येष्ठ नेते सोपानराव  नादरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 2012 पासून हुतात्मा बहिर्जी शिक्षण कोणतेही काम कायदेशीर झालेले नाही. न्यायालयाने आतापर्यंत अनेकदा मनमानी कारभाराविरोधात निकाल दिलेले आहेत मात्र स्वतः त्यांना सोडवली जात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस व बेकायदेशीर कारभार सुरू असेल व न्यायालयाच्या निर्णयाला मानत नसतील तर नाईलाजाने कोर्टात जाऊन गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा जेष्ठ नेते सोपानराव नादरे यांनी देशोन्नतीशी बोलताना दिला.