Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नागनाथ अर्बन को-ऑप बँक

हिंगोलीतील नागनाथ अर्बन को- ऑप बँकेच्या मुख्य कार्यालय व शाखेच्या नवीन इमारतीत स्थलांतर सोहळा

Nagnath Urban Co-op Bank: -हिंगोलीतील नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या मुख्य कार्यालय व शाखेच्या नवीन इमारतीत स्थलांतर सोहळा उत्साहात संपन्न झाला.


हिंगोलीतील नागनाथ अर्बन को- ऑप बँकेच्या मुख्य कार्यालय व शाखेच्या नवीन इमारतीत स्थलांतर सोहळा

Nagnath Urban Co-op Bank |

हिंगोली (Nagnath Urban Co-op Bank) : नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हिंगोली बँकेच्या मुख्य कार्यालय व शाखेच्या नवीन इमारतीत स्थलांतर सोहळा संपन्न झाला. 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता   खासदार ‌ नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन ऍड. सतीश देशमुख हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तानाजीराव मुटकुळे ‌ साहेब. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा श्री गजानन रावजी घुगे , विनायकराव भिसे,  संदेश देशमुख, वाशीम देशमुख, गोपू पाटील, दिपकराव वडकूते , श्री उद्धवरावजी गायकवाड, बासटवार चेंबर्स चे मालक विलास नारायणराव बासटवार हे होते.  

प्रास्ताविकात बँकेचे (Nagnath Urban Co-op Bank) संचालक श्री महेश बियाणी CA ह्यांनी बॅंकेच्या झालेल्या प्रगतीचा लोखाजोखा मांडला. स्वागतपर भाषनात संचालक दिलीपराव चव्हाण यांनी सुध्दा बॅंक गाळातून वर काढण्यासाठी सर्वांना फार मोठे प्रयत्न करावे लागले. कर्ज वाटप अत्यंत काळजीपूर्वक केले जाते. संचालक मंडळ कर्ज वाटपात हस्तक्षेप करित नाही, ही बाब स्पष्ट केली. आपल्या उदघाटकिय भाषनात खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी बॅंकेच्या प्रगती वर समाधान व्यक्त करून नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे नवीन शाखा उघडली तर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अध्यक्षिय भाषनात बॅंकेचे चेअरमन  ऍड. सतिश देशमुख यांनी २००९मध्ये बॅंकेचे व्यवस्थापन हातात घेतले तेंव्हाची स्थिती व आजची मार्च २०२६ च्या प्रगती वर  प्रकाश  टाकला.
मुख्य बाजारपेठेत आम्ही स्थलांतरित झाल्यामुळे निश्चितच व्यवहारांत वाढ होणार आहे असे मत व्यक्त केले. लवकरच आम्ही शाखा विस्तारावर भर देणार आहोत. हदगाव येथे सुध्दा लवकरच सर्हे करून शाखेला मंजूरी देऊन शाखा सुरू करण्यात  येईल असे जाहीर केले. बॅंकेचे सर्व संचालक, कर्मचारी व ग्राहकांचे आभार मानले. उपाध्यक्ष खंडेराव सरनाईक यांनी सुत्रसंचलन करताना बॅंकेच्या विविध टप्प्यांवर आम्ही कसे काळजी पूर्वक निर्णय घेत कार्य करत रहलो ह्यावर प्रकाश टाकला.

या वेळी (Nagnath Urban Co-op Bank) बॅंकेचे पुढील संचालक उपस्थित होत. एड. मनोज आखरे , डॉक्टर सत्यनारायण तापडिया. ऍड केशव शिरसाठ , बापूराव बांगर, रमेश मंडले, बालाप्रसाद जोशी (गुरु) , डॉ. रमेश मस्के  , मो. जिया मो. उस्मान कुरेशी , विनायकराव कल्याणकर, साहेबराव गूठ्ठे,  सिंधुताई सरनाईक , श्रीमती सुनिताताई मुळे, सरव्यवस्थापक कुंडलिक घुगे , व्यवस्थापक आशिष राके , उपव्यवस्थापक अरविंद देशपांडे (लोहगावकर), आय.टी. व्यवस्थापक साहेबराव सावळे,  बँकेचे वकिल एड . अभिजय चव्हाण,  हिंगोली शाखा व्यवस्थापक विनय वाकोडकर इतर शाखेचे शाखा व्यवस्थापक, आघाव, सुजित भाले , राजेंद्र साखरेकर, कर्ज व्यवस्थापक मंगेश घूगे व मुख्य कार्यालय व शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

Related to this topic: