Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पोलिस

अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान

Hingoli Police: हिंगोलीत अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित केले गेले.


अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान

Hingoli Police |

हिंगोली (Hingoli Police) : जिल्हापोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ निलाभ रोहन व अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या वतीने प्रो. पोलीस उपाधिक्षक मयुर रसाळ यांच्या सह स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरिक्षक मोहन भोसले, सपोनी शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक माधव जिवारे, दिलीप मोरे यांच्या सह पथकातील कर्मचारी यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

चोरी, खुन जबरी चोरी, अशा विविध गंभीर गुन्ह्याचा तपास करत आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी धाडशी मोहीम राबविण्यात आली असुन (Hingoli Police) पोलिस अधीक्षक डॉ निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक माधव जिवारे, उपनिरीक्षक दिलीप मोरे यांच्या सह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी गंभीर गुन्हे उघडकिस आनले असुन अनेक अवैध धंद्यावर कारवाया केल्या आहेत. यामध्ये अवैध वाळू वाहतूक, गुटखा, जुगार आदींवर कारवाई केली आहे. एकंदरीत स्थानिक गुन्हे शाखेचे काम उत्कृष्ट सुरू असल्याचे दिसून येत आहे.

अनेक प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींचा शोध लावला. राज्यासह बाहेर राज्यातुन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विविध गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. त्यातून अनेक गुन्ह्याचा अल्पावधीतच उलगडा होऊन आरोपींना अटक करण्यात आली तसेच चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, यांनी अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक करत प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. त्यांच्या या कार्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा उंचावली असून, भविष्यातही अशाच तत्परतेने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या सन्मानामुळे पोलिस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

Related to this topic: