Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली केरोसिन नकार

जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांचा केरोसिन उचलण्यास नकार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Hingoli Kerosene Rejection: हिंगोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केरोसिन उचल करण्यास असमर्थता दर्शवली. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करून केरोसिन साठवणूकीच्या अडचणी


जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांचा केरोसिन उचलण्यास नकार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Hingoli Kerosene Rejection |

हिंगोली (Hingoli Kerosene Rejection) : जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केरोसिन उचल करण्यास असमर्थता दर्शवली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. भिकुलाल बाहेती, अशोकराव काळे, शावा गौरी, आसेफ गौरी, नवनाथ कानबाले, फारूकभाई टाले, अमित बांगर यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शासनाने केरोसिन वितरणाचे धोरण ठेवले असले तरी प्रत्यक्षात लाभार्थी केरोसिन घेण्यास इच्छुक नाहीत. 

सध्या घरगुती वापरासाठी केरोसिन स्टोव्हचा (Hingoli Kerosene Rejection) वापर जवळपास बंद झाला आहे. उज्ज्वला योजनेमुळे बहुतांश कुटुंबांकडे एलपीजी गॅस आहे. त्यामुळे लाभार्थ्यांकडून केरोसिनला मागणीच उरलेली नाही, असे दुकानदारांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे केरोसिनचा साठा, वितरण दर, कमिशन, वाहतूक व्यवस्था याबाबत शासनाकडून स्पष्ट नियोजन नाही. दुकानांमध्ये केरोसिन साठवणुकीसाठी आवश्यक टाक्या, मोजमापासाठीची साधने व अग्निसुरक्षेची व्यवस्था उपलब्ध नाही. केरोसिन हा ज्वलनशील पदार्थ असल्याने त्याची साठवणूक व वितरण करताना धोका संभवतो. त्यामुळे दुकानदार केरोसिन उचलण्यास तयार नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. 

जिल्हा प्रशासनाने या (Hingoli Kerosene Rejection) समस्येकडे प्राधान्याने लक्ष देऊन हिंगोली जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना केरोसिन उचल करण्यास इच्छुक नसल्याची नोंद घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. केरोसिनला मागणी नसताना उचल सक्तीची केल्यास आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल, अशी भीतीही दुकानदारांनी व्यक्त केली. दरम्यान, या निवेदनाची प्रत पुरवठा विभागालाही देण्यात आली असून प्रशासनाकडून यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: