Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अवैध रेती वाहतूक

लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप; तहसीलदारांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

Illegal sand transport: हिंगोलीत तहसीलदारांनी अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला. टिप्पर व रेतीसह 15 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.


लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप तहसीलदारांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

Illegal sand transport |

अवैध रेती व टिप्पर सह 15 लाखाचा मुद्देमाल जप्त 
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली (Illegal sand transport) : तालुक्यातील खांबाळा येथील लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप करून हिंगोलीकडे परतत असताना तहसीलदार श्रीकांत रमेश भुजबळ व त्यांच्या पथकाने 27 एप्रिलला पळशी रोडवर अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर रंगेहाथ पकडला. या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा हायवा टिप्पर व तीन ब्रास रेती जप्त करण्यात आली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार श्रीकांत भुजबळ हे सोमवार, २७ एप्रिल रोजी ईडोळीचे ग्राम महसूल अधिकारी विनोद ठाकरे यांच्या समवेत खांबाळा येथील लाभार्थ्यांना मोफत रेतीचे वाटप करून सायंकाळी ५ ते ५:३० वाजेच्या सुमारास  हिंगोलीकडे येत होते. खुशाल नगर, अंबिका कमान, पळशी रोड परिसरात त्यांना एमएच ३८ डी ९१७७ क्रमांकाचा भारत बेंझ कंपनीचा पिवळा टिप्पर संशयास्पदरीत्या जाताना दिसला. तहसीलदार व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ वाहन थांबवून तपासणी केली. 

चौकशीदरम्यान टिप्पर चालक सचिन दिलीप सरकटे, वय २९, रा. साबलखेडा ता. सेनगाव याच्याकडे (Illegal sand transport) रेती वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना आढळला नाही. वाहनात अंदाजे ३ ब्रास रेती होती. रेती कोठून आणली व कुठे नेत आहोत याबाबत चालकाने समाधानकारक माहिती दिली नाही. वाहन मालकाचे नावही त्याला सांगता आले नाही.

अवैधरित्या गौण खनिजाची (Illegal sand transport) चोरटी वाहतूक होत असल्याची खात्री झाल्याने तहसीलदार भुजबळ यांनी पथकाच्या मदतीने टिप्पर व चालकाला ताब्यात घेतले. वाहन थेट हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सरकारतर्फे फिर्यादी होऊन श्रीकांत भुजबळ यांनी रात्री ९:०८ वाजता लेखी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री ९:१७ वा. गु.र.क्र. ०२७९ नोंदवला. आरोपी सचिन सरकटे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७) व ४८(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९ व १५ अन्वये गुन्हा दाखल आहे. जप्त टिप्परची किंमत १५ लाख तर रेतीची किंमत १२ हजार रुपये आहे. 

या (Illegal sand transport) प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल मोहमद अहमद शेख करीत आहेत. तहसीलदार भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीत पथकातील कर्मचाऱ्यांच्या नावांचा उल्लेख नसला तरी, पथकाच्या सतर्कतेमुळेच ही कारवाई यशस्वी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अवैध रेती उपशाला आळा घालण्यासाठी महसूल विभागाची धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: