Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली युवक आत्महत्या

एकुलत्या एक मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Hingoli youth suicide: हिंगोली शहरातील एक उच्च शिक्षित २५ वर्षीय विद्यार्थी, राहुल विलास उन्हाळे, बी फार्मसी साठी नोकरीत असतानाच गळफास करून आत्महत्या करून मृत दिसला.


एकुलत्या एक मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Hingoli youth suicide |

 

हिंगोली एसआरपी एफ कॅम्प जवळील घटना

हिंगोली (Hingoli youth suicide) : शहरातील प्रगती नगर कारवाडी भागातील एका उच्च शिक्षित २५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने कुटूंबीयावर मोठे संकट कोसळले आहे.

याबाबत पोलिस सुत्राकडुन मिळालेली माहिती अशी की, कळमनुरीतील सैनिकी शाळेमधील विलास उन्हाळे हे हिंगोली शहरातील प्रगती नगर कारवाडी भागामध्ये वास्तव्यास असून त्यांचा मुलगा राहुल विलास उन्हाळे (२५) हा नुकताच बी फार्मसी झाला होता. ६ जून रोजी सकाळी ९ वाजता त्याने जेवन केल्या नंतर बाहेर जातो असे म्हणुन घराबाहेर पडला होता. राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ च्या व्यायाम शाळेजवळील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत (Hingoli youth suicide) मृतदेह जवानांना दिसून आला. त्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना देताच घटनास्थळी सपोउपनि संजय मार्के, गणाजी पोटे, गजानन मस्के, शेख अमजद, सोनटक्के यांच्या पथकाने धाव घेतली.

सदरील युवक राहुल उन्हाळे हा असल्याची खात्री झाल्या नंतर त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेण्यात आले. ६ जून रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्यावर ७ जून रोजी सकाळी रिसाला बाजारातील पॉवर हाऊस स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्च्यात आई, वडिल, एक बहिण, भाऊजी असा परिवार आहे. राहुल हा एकुलता एक मुलगा होता.

Related to this topic: