Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली वाहतूक शाखा

भाजी मंडईतील रस्ता तातडीने खुला करा, अन्यथा कारवाई; शहर वाहतूक शाखेचा इशारा

Hingoli Traffic Branch: शहरातील भाजी मंडई परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेने कठोर पाऊल उचलले आहे. भाजी मंडईतील मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्त करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा


भाजी मंडईतील रस्ता तातडीने खुला करा अन्यथा कारवाई शहर वाहतूक शाखेचा इशारा

Hingoli Traffic Branch |

हिंगोली (Hingoli Traffic Branch) : शहरातील भाजी मंडई परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेने कठोर पाऊल उचलले आहे. भाजी मंडईतील मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्त करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक जी. शेख यांनी दिला आहे. भाजी मंडईत विक्रेते आणि हातगाडीधारकांकडून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळपासूनच येथे वाहनांची कोंडी होते. नागरिकांना, रुग्णवाहिकांना आणि शाळेच्या बसला देखील मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. या (Hingoli Traffic Branch) पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने मंडई परिसराची पाहणी केली. 

पाहणीनंतर पोलिस निरीक्षक जी. शेख यांनी विक्रेत्यांना रस्ता तातडीने मोकळा करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यावर मांडलेले स्टॉल, हातगाड्या आणि इतर साहित्य त्वरित हटवावे. यानंतरही रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास मोटार वाहन कायद्यासह अन्य संबंधित कलमांखाली कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (Hingoli Traffic Branch) वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत मंडई परिसरात विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.