Hingoli Trading Associations: खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी माणिकराव लोडे तर उपाध्यक्षपदी निखिल बांगर यांची ५ जून शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. येथील दी. हिंगोली तालुका सहकारी खरेदी - विक्री संघ
हिंगोली (Hingoli Trading Associations) : खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी माणिकराव लोडे तर उपाध्यक्षपदी निखिल बांगर यांची ५ जून शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. येथील दी. हिंगोली तालुका सहकारी खरेदी - विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी खरेदी - विक्री संघाचे व्यवस्थापक आसिफ गौरी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अध्यासी अधिकारी बी. डी. पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा ५ जून रोजी घेण्यात आली. दी हिंगोली तालुका सहकारी खरेदी - विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेत भाजप प्रणित पॅनलने घवघवीत यश संपादन केल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पद भाजपच्या खात्यात जाणार हे निश्चित होते.
अध्यक्षपदासाठी उमेश नागरे आणि माणिकराव लोडे यांची नाव चर्चेत होती. ५ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत उमेश नागरे यांनी माणिकराव लोडे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले तर त्याला मुटकुळे विठोबा सदाशिव यांनी अनुमोदन दिले आणि संचालक मंडळाने ठरावास सर्वानुमते संमती दिल्याने माणिकराव लोडे यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदाची माळ निखिल बांगर यांच्या गळ्यात पडली. उपाध्यक्ष पदासाठी निखिल बांगर यांचे नाव इंगोले नारायण किसनराव यांनी सुचविले तर त्यास थोरात सदाशिव दत्तराव यांनी अनुमोदन दिले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक उमेश नागरे, विठोबा मुटकुळे, नारायणराव इंगोले, भानुदास वामन, सदाशिव थोरात, सरस्वतीबाई जाधव, श्रीमती किरण बर्वे, रमेश चौधरी, उपस्थित होते. आ. तान्हाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश थोरात, अशोक काळे यांनी खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष माणिकराव लोडे व उपाध्यक्ष निखिल बांगर यांचा सत्कार केला. यावेळी अॅड. के. के. शिंदे, प्रा. गुलाब भोयर, नारायण खेडेकर, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, विलास गोरे, रजनिश पुरोहीत, नगरसेवक हमिद प्यारेवाले, बंडू कर्हाळे, संतोष टेकाळे, मनोज शर्मा, सदाशिव सुर्यतळ, संदिप वाकडे, सचिन बांगर, अमित रुहाटीया, बळीराम गुठ्ठे, राजेश बांगर आदी उपस्थित होते.