Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली एसआयआर मोहीम

हिंगोलीत एसआयआर नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम

Hingoli SIR Campaign: मतदार यादीतील नावे सुटू नयेत आणि प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव एसआयआर मध्ये नोंद व्हावे यासाठी हिंगोली शहरात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.


हिंगोलीत एसआयआर नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम 

Hingoli SIR Campaign |


उपाध्यक्ष अब्दुल माबुद बागवान यांची प्रभाग 9 मध्ये फिल्डवर धावपळ, मदत कक्षातून नागरिकांना दिलासा

हिंगोली (Hingoli SIR Campaign) : मतदार यादीतील नावे सुटू नयेत आणि प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव एसआयआर मध्ये नोंद व्हावे यासाठी हिंगोली शहरात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये दररोज मदत कक्ष नगर पालिकेचे उपाध्यक्ष अब्दुल माबूद बागवान यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आला आहे. या मदत कक्षात एसआयआर फॉर्म भरणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया यासाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नवमतदारांसाठी स्वतंत्र काउंटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

या कामात हिंगोली नगरपालिकेचे उपाध्यक्ष अब्दुल माबुद बागवान हे देखील सक्रिय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते प्रभाग 9 च्या विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. नावे वगळली जाण्याची भीती असलेल्या कुटुंबांची माहिती गोळा करून त्यांची नावे तातडीने एसआयआरमध्ये समाविष्ट करण्याकरता ते प्रयत्नशील आहेत.

"कोणाचेच नाव यादीतून सुटता कामा नये. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ही मोहीम यशस्वी करणे गरजेचे आहे," अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष माबुद बागवान यांनी यावेळी दिली.

मदत कक्षाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दररोज शेकडो अर्ज याठिकाणी भरले जात आहेत. यामुळे एसआयआर प्रक्रियेबाबत असलेला संभ्रम दूर होऊन लोकांमध्ये जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त नावे नोंद व्हावीत यासाठी अशीच मोहीम इतर प्रभागांमध्येही राबवण्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

या (Hingoli SIR Campaign) नाव नोंदणीसाठी प्रभाग क्रमांक नऊ मधील अब्दुल मुक्तदिर बागवान, बागवान मोहम्मद लइक, मोहम्मद खाजा, BLO शेख मोहम्मद मतीन, BLO पठान काशिफ, मोहम्मद आबिद शफिक, सदा अब्दुल करीम बागवान, अब्दुल हमीद सुल्तान साहब, सय्यद यूसुफ सय्यद आजम आदी  धडपड करीत आहेत.

Related to this topic: