Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली वीज खंडित

हिंगोलीतील ८ नागरी वस्त्या १२ तास अंधारात; संतप्त नागरिकांनी अभियंत्याला विचारला जाब

Hingoli Power outage: हिंगोलीत रेल्वे उड्डाणपुलाचे काम करण्यात जेसिबीच्या केबलतुडण्याच्या कारणात ८ प्रमुख वसतींचा वीजपुरवठा सायंकाळी खंडित झाला. नागरिकांच्या दुरुपयोगाच्या आरोप


हिंगोलीतील ८ नागरी वस्त्या १२ तास अंधारात संतप्त नागरिकांनी अभियंत्याला विचारला जाब

Hingoli Power outage |

हिंगोली (Hingoli Power outage) : शहरात सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामा दरम्यान जेसीबीने भूमिगत केबल तोडल्यामुळे हिंगोलीतील ८ प्रमुख नागरी वस्त्यांना तब्बल १२ तास अंधाराचा सामना करावा लागला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकार्‍यांना कार्यालयातच घेरले.

 अखेर मध्यरात्री दीड वाजता स्थानिक नागरिकांच्या मदतीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.दुपारपासून वीज खंडित, दुरुस्तीचे खोटे दावे मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात जेसीबीमुळे वीज केबल तुटल्याने सायंकाळी ५:०० वाजल्यापासून शहरातील शिवाजीनगर, शास्त्रीनगर, सिद्धार्थ कॉलनी, अष्टविनायक नगर, भट्ट कॉलनी, आरा मशीन, तोफखाना आणि जिल्हा परिषद शासकीय निवासस्थान संकुल परिसराचा (Hingoli Power outage) वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी तक्रार निवारण केंद्रावर संपर्क साधला असता, कर्मचार्‍यांनी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही हालचाल नव्हती.नांदेडच्या पथकाचे गाजर, अभियंत्यांना डांबलेउशिरा सायंकाळी वैतागलेल्या नागरिकांनी थेट रेल्वे पुलाजवळ जाऊन पाहिले असता तिथे कोणतेच काम सुरू नसल्याचे समोर आले. यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. सर्व वस्त्यांमधील नागरिक गोळा झाले आणि त्यांनी थेट वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले.

 त्याठिकाणी केवळ अतुल पेटकर व सचिन बेलसरे हे दोन अभियंता उपस्थित होते. 'काम करण्यासाठी तज्ञांचे पथक नांदेडहून येत आहे,' असे सांगून अधिकार्‍यांनी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत हे पथक आलेच नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी दोन्ही अधिकार्‍यांना कार्यालयातून कुठेही जाऊ न देता तिथेच रोखून धरले.
महावितरणकडे साधे टॉर्च, शिडीही मिळेना!अर्धी रात्र उलटल्यानंतर या अधिकार्‍यांनी दुसर्‍या भागातून (Hingoli Power outage) वीजपुरवठा डायव्हर्ट करून देण्याचे प्रयत्न सुरू केले. धक्कादायक बाब म्हणजे, हे काम करण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्‍यांकडे टॉर्च, दोरी, शिडी यासारखे साधे साहित्यही उपलब्ध नव्हते, तसेच पुरेसे कर्मचारीही हजर नव्हते.

लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वतः धावून केले कामअखेर स्थानिक नागरिकांनी स्वतः सर्व साहित्याची जुळवाजुळव केली.  या संकटसमयी नगरसेवक नाना नायक, जीतसिंह शाहू, कृष्णा अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, नितीन केसाका, लकी जयस्वाल, प्रवीण भट्ट, हनुमान गवारे, सुरेश लिंबेळकर, शेख जावेद, शेख अमजद, संजय सुगंधे, राहूल बल्गे, रोहीत नगरकर, अजहरखान पठाण, मझहर पठाण, शेख इलियास आदी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे रात्री दीड वाजता या भागातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. या संपूर्ण प्रकारामुळे महावितरणच्या नियोजनशून्य कारभाराविरुद्ध हिंगोलीकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related to this topic: