Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करणाऱ्यालाच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी — जयप्रकाश दांडेगावकर

हिंगोलीतील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करणाऱ्यालाच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी — जयप्रकाश दांडेगावकर

Hingoli News |

राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांची बैठक; अनेकांनी व्यक्त केली जिल्हाध्यक्ष पदाची इच्छा

हिंगोली (Hingoli News) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक मराठवाडा प्रभारी तथा माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, २३ मे २०२६ रोजी राष्ट्रवादी भवन, हिंगोली येथे पार पडली.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, “महागाई व बेरोजगारीमुळे जनता व युवक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सत्ता बदल नक्कीच होणार, पण संघर्ष करणे ही काळाची गरज आहे. हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक बांधणी मजबूतपणे करेल त्यालाच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाईल.”

या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रवि शिंदे, हिंगोली विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे, मनीषा आखरे, शहराध्यक्ष मुजीब पठाण तसेच कळमनुरी तालुकाध्यक्ष डॉ. संतोष बोंढारे यांनी पक्षाकडे मागणी करून इच्छा व्यक्त केली.

या बैठकीला पक्षाचे बाबुराव दळवी, मोईन बागवान, गणेशराव गडदे, गजानन गव्हाणे, लक्ष्मण पोटे, सोनू चव्हाण, धीरज काकडे, डॉ. वेदांत मरळे, अभिजित देशमुख, सुशील बोंढारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related to this topic: