Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नीट पेपर फुटी

नीट पेपर फुटीचा हिंगोली प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन कडून निषेध

NEET Paper Leak: प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन जिल्हा हिंगोलीच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. संपूर्ण देशभर गाजत असलेल्या या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर


नीट पेपर फुटीचा हिंगोली प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन कडून निषेध

NEET Paper Leak |

 

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

हिंगोली (NEET Paper Leak) : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन जिल्हा हिंगोलीच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. संपूर्ण देशभर गाजत असलेल्या या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. 

निवेदनात नीट पेपर फुटी प्रकरणात काही कोचिंग क्लासेसमधील अपप्रवृत्तींचा समावेश असल्याचा आरोप करत त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू असून ती लवकरात लवकर पूर्ण करून दोषींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. त्याचबरोबर देशातील कोचिंग क्लासेसमधील निष्पाप लोकांना कायद्याचे पूर्ण संरक्षण मिळावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. 

निवेदन स्वीकारल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांनी या निवेदनाची योग्य दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी राज्य पदाधिकारी प्रा. रामभाऊ कोळपे, पीटीएचे अध्यक्ष प्रा. मुरुडकर, माजी अध्यक्ष प्रा. महेश जोशी आणि प्रा. सुनील शुक्ला, प्रा. शैलेश माने, प्रा. मजहर सय्यद, प्रा. गणेश सरदेशपांडे, प्रा. हरण, महेश पेंडके आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

हिंगोली जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेले हे (NEET Paper Leak) निवेदन राज्यभरातील जिल्ह्यांच्या ठिकाणी देण्यात येत आहे.

Related to this topic: