Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली नगर परिषद

हिंगोली शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्यांवर नगर परिषदेची धडक कारवाई

Hingoli Municipal Council: जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या आदेशानुसार आज 10 जून रोजी हिंगोली नगर परिषदेने शाळा व महाविद्यालय परिसरातील बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर धडक मोहीम


हिंगोली शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्यांवर नगर परिषदेची धडक कारवाई 

Hingoli Municipal Council |


8 हजारांचा तंबाखूजन्य माल जप्त करून नष्ट

हिंगोली (Hingoli Municipal Council) : जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या आदेशानुसार आज 10 जून रोजी हिंगोली नगर परिषदेने शाळा व महाविद्यालय परिसरातील बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर धडक मोहीम राबवली. मुख्याधिकारी अरविंद मुढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या कारवाईत अंदाजे 7 ते 8 हजार रुपये किमतीचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सदर मोहिमेदरम्यान जप्त केलेला सर्व माल पथकामार्फत जागीच जाळून नष्ट करण्यात आला. शाळा-महाविद्यालय परिसरात व्यसनाधीन पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या कारवाईत उप मुख्याधिकारी प्रकाश साबळे, नगर रचनाकार प्रविण मोहेकर, सहायक नगर रचनाकार गजानन काळे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, आकाश देशमुख, संगणक अभियंता रामेश्वर चाटे, स्थापत्य अभियंता स्नेहल आवटे, अग्निशमन अधिकारी अक्षय तांडेल, पंडित मस्के यांच्यासह नगर परिषदेचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शैक्षणिक संस्थांजवळील पानटपऱ्यांवर लक्ष केंद्रित करून ही कारवाई करण्यात आल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. यापुढेही अशा मोहिमा सुरू राहतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related to this topic: