Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आनंद नगरी महोत्सव

हिंगोलीत भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त 'आनंद नगरी' उत्साहात

Anand Nagari Festival: शहरातील महावीर भवन येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे औचित्य साधून सम्यक प्रबोधिनी महिला मंडळाच्या वतीने 'आनंद नगरी' (जैन शुद्ध रेसिपी) प्रदर्शनाचे दिमाखदार आयोजन


हिंगोलीत भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आनंद नगरी उत्साहात

Anand Nagari Festival |

जैन शुद्ध रेसिपींचे विशेष आयोजन

हिंगोली (Anand Nagari Festival) : शहरातील महावीर भवन येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे औचित्य साधून सम्यक प्रबोधिनी महिला मंडळाच्या वतीने 'आनंद नगरी' (जैन शुद्ध रेसिपी) प्रदर्शनाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. जैन संस्कृतीतील सात्विक आहार आणि शुद्ध शाकाहारी पाककलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन या आनंद नगरीचे उद्घाटन सुनिता मुळे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर महावीर जन्मकल्याणक समितीच्या अध्यक्षा ममता काळे, सम्यक प्रबोधिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वप्ना दोडल, सचिव अश्विनी यंबल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारे व्यक्तिमत्व आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मिलिंद जैन, तसेच निश्चल यंबल, सुमित कान्हेड, रत्नाकर महाजन, आणि आशिष दोडल हे देखील उपस्थित होते.

महिला मंडळाचा सक्रीय सहभाग
सम्यक प्रबोधिनी महिला मंडळाच्या सदस्यांनी अतिशय मेहनतीने हे प्रदर्शन यशस्वी केले. यामध्ये दर्शना कंदी, सारिका मास्ट, नेहा यंबल, माधवी दोडल, वंदना सोवितकर, पूजा कंदी, सुप्रिया कंदी, मयुरा मास्ट आणि यंबल परिवारातील सदस्यांनी विशेष पुढाकार घेतला. (Anand Nagari Festival) प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या विविध जैन शुद्ध रेसिपींनी उपस्थितांची मने जिंकली.

समाजाचा उदंड प्रतिसाद
भगवान महावीरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, अहिंसेवर आधारित शुद्ध आहाराचे महत्त्व या उपक्रमातून पटवून देण्यात आले. यावेळी केवळ महिलाच नव्हे, तर जैन समाजातील पुरुष आणि तरुणांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद लुटला. महावीर भवन परिसर यावेळी जय जिनेंद्रच्या जयघोषाने आणि आनंदमयी वातावरणाने दुमदुमून गेला होता.

Related to this topic: