Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली भुकंप

भुकंपाच्या धक्याने हिंगोली जिल्हा हादरला; ४.६ रिस्टर स्केलची नोंद

Hingoli earthquake: हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंधा नागनाथ, कळमनुरी येथे मध्यरात्री चार सहज भुकंप झाल्या. नागरिकांनी घराबाहेर धावले. खोरत आणि भिंती तडपण्याचा समस्या पटले.


भुकंपाच्या धक्याने हिंगोली जिल्हा हादरला ४६ रिस्टर स्केलची नोंद

Hingoli earthquake |

 

भुकंपाच्या धक्याने नागरिकांची घराबाहेर धाव; प्रशासना कडुन नुकसानीची पाहणी

हिंगोली (Hingoli earthquake) : जिल्ह्यात भुकंपाची मालीका सुरु असताना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सलग चार भुकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेवुन रात्र जागुन काढली.

हिंगोली जिल्ह्यामध्ये अधून मधून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. विशेष करुन वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी या तीन तालुक्यात प्रामुख्याने जमिनीतुन गुढ आवाज बाहेर येणे व भुकंपाचे धक्के ही बाब नित्याचीच झाली आहे. गुरुवारी ९ जुलै रोजी मध्यरात्री १.३६ वाजता ४.६ रिस्टर स्केलचा भुकंप झाला. वसमत तालुक्यातील शिरली हे भुकंपाचे केंद्र बिंदु असुन त्यांची खोली १० किमी आहे. हा पहिला धक्का जाणवल्यानंतर लगेचच २.१५ वाजता भुकंपाचा दुसरा धक्का जाणवला. ज्या-ज्या नागरिकांना पहिल्या भुकंपाची जाणीव झाली नाही असे नागरिक दुसऱ्या भुकंपाच्या धक्याला घराबाहेर पडले. हा दुसरा भुकंपाचा धक्का ३.६ रिस्टर स्केलचा होता.

तिसरा भुकंपाचा धक्का २.१७ मिनिटाला जाणवला तो ३.९ रिस्टर स्केलचा होता. तर ३.२३ वाजता ४.१ रिस्टर स्केलचा भुकंप झाला. या भुकंपाचा केंद्र बिंदु औंढा नागनाथ तालुक्यातील काकडदाबा हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत या तालुक्यात भुकंपाची तिव्रता अधिक जाणवली. विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये देखील नागरिकांनी घराबाहेर धाव घेवुन रात्र जागुन काढली. वसमत तालुक्यातील पांगरी शिंदे येथे ६० ते ७० घराच्या भिंतींना तडे गेले. त्याच प्रमाणे औंढा नागनाथ तालुक्यातील आमदरी येथे एका घराची भिंत कोसळुन १५ ते २० घराच्या भिंतींना तडे गेले.

मध्यरात्री झालेल्या भुकंपाच्या धक्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अनेक ठिकाणी भेटी देवुन अधिकाऱ्यांना नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. भुकंपाच्या धक्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अफवा पसरवु नये असे आवाहन करण्यात आले. या भुकंपामध्ये कुठेही जिवित हानी झाली नाही.

Related to this topic: