Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली डिवायएसपी

रिक्त पदांची वानवा असलेल्या जिल्ह्याला मिळाले चार डिवायएसपी

Hingoli DySP: उपलब्ध उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे रिक्त असलेल्या उपविभागाचा पदभार सोपविला जात होता. परंतु २३ जूनला गृहविभागाने काढलेल्या आदेशात जिल्हा पोलिस दलाला एका ठोक्यात चार डिवायएसपी


रिक्त पदांची वानवा असलेल्या जिल्ह्याला मिळाले चार डिवायएसपी

Hingoli DySP |

हिंगोली (Hingoli DySP) : मागील काही वर्षापासून उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांची रिक्त पदे होती. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसह अनेक बाबीवर त्याचा परिणाम जाणवत होता. उपलब्ध उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे रिक्त असलेल्या उपविभागाचा पदभार सोपविला जात होता. परंतु २३ जूनला गृहविभागाने काढलेल्या आदेशात जिल्हा पोलिस दलाला एका ठोक्यात चार डिवायएसपी मिळाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर ग्रामीण उपविभागीय पोलस अधिकारी सतिष बाबुराव वाघ यांची हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी पदी, पुणे ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिवाजीराव देशमुख यांची हिंगोली शहर उपविभागीय पोलिस अधिकारी पदी, बृहन्मुंबई येथील हरीष श्रीकृष्ण गवळी यांची पोलिस उपाधिक्षक मुख्यालयी हिंगोली तर नांदेड येथील बबन गंगाराम कर्‍हाळे यांची पोलिस उपाधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा हिंगोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या चारही उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे.

कुंदनकुमार वाघमारे यांची पूर्णा उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर येथून पदोन्नतीवर आलेले कुंदनकुमार वाघमारे यांची हिंगोली शहर पोलिस अधिकारी पदी ऑगस्ट २०२५ मध्ये नियुक्ती केली होती. नगर परिषद निवडणूकीच्या धामधूमीत ८ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी हिंगोलीत पदभार स्विकारला होता. शासनाच्या गृहविभागाने २३ जून रोजी काढलेल्या आदेशात कुंदनकुमार वाघमारे यांची पूर्णा उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची ही बदली अवघ्या ६ महिन्यात झाली आहे.