Hingoli Cycling Association: हिंगोली येथून पंढरपूर रिंगण सोहळ्यासाठी गेलेले १२ सायकलस्वारी १२ जुलैला एकत्रित सहभागी होणार असून पर्यावरण आणि आरोग्याच्या जगृतीचीही यात समाविष्ट आहे.
हिंगोली (Hingoli Cycling Association) : हिंगोली असोसिएशनच्या पुढाकारातून पंढरपूर रिंगण सोहळ्यासाठी हिंगोली येथून 12 सायकल स्वार पंढरपूरकडे गुरुवारी रवाना झाले. राज्यातून जवळपास चार हजार सायकल स्वार पंढरपूरात 12 जुलै रोजी एकत्र जमून रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यानुसार बुधवारी अमरावती येथील 45 सायकल स्वार हिंगोली मार्गे पंढरपूरकडे रवाना झाले. त्यानुसार गुरुवारी हिंगोली येथील सायकल स्वार सकाळी सहा वाजता श्रीनगर येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात आरती करून पंढरपूर कडे रवाना झाले.
यामध्ये चार सायकल पट्टू हे साठ वर्षावरील आहेत. नऊ ते 12 जुलै पर्यंत हा प्रवास आहे. 12 जुलै रोजी पंढरपूर येथे रिंगण सोहळा रंगणार आहे. यामध्ये सायकलिंग असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष प्रवीण काळबांडे, रमेश सानप, डॉ. गजानन शिंदे, शिवचरण ठाकूर, राजेश पांडे, गजानन घुगे, विठ्ठल जाधव, मारुती बोबडे, विवेक वाकडे, अविनाश बोथीकर, श्रीरंग कऱ्हाळे आदींचा समावेश आहे.
प्रवासा दरम्यान पर्यवारण, आरोग्य याची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच बॉल सीड सोबत घेऊन वृक्षारोपण करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवासा दरम्यान ठीक ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे.