Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

फोन पे

चुकून दुसऱ्या फोन पे वर गेलेले ८० हजार रुपये मिळाले परत

Phone pay: हिंगोली सायबर सेलने त्वरित कारवाई करून चुकून दुसऱ्या खात्यावर गेलेले ८० हजार रुपये यशस्वीपणे परत मिळवले.


चुकून दुसऱ्या फोन पे वर गेलेले ८० हजार रुपये मिळाले परत

Phone pay |

हिंगोलीच्या सायबर सेलचे प्रयत्न; आईच्या रुग्णालय कामासाठी पाठविलेले पैसे दुसऱ्या खात्यावर गेल्याने युवक हतबल

हिंगोली (Phone pay) : आईच्या उपचारासाठी पाठवले जाणारे ८० हजार रुपये चुकून दुसऱ्या फोन पे वर गेल्यानंतर हिंगोलीच्या सायबर सेलने तातडीने कारवाई करत ८० हजार रुपये परत मिळवून दिली आहेत. सायबर सेलच्या पथकाने केलेल्या प्रयत्नामुळे जांब येथील सदर व्यक्तीच्या आईच्या उपचाराचा मार्ग सुकर झाला.

अकोला जिल्ह्यातील जांब येथील अशोक सूर्यभान लठाड हे हिंगोली येथील कामाच्या निमित्ताने आले होते. त्यांच्या आईच्या उपचारांसाठी वर्धा येथे त्यांच्या भावाच्या फोन पे नंबर वर ८० हजार रुपये पाठवले परंतु फोन पे मोबाईल नंबरचा एक नंबर चुकल्यामुळे सदरचे ८० हजार हे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरातील एका महिलेच्या अकाउंट वर गेले. सदरची चूक कळल्यानंतर अशोक लठाड यांनी सदर महिलेला संपर्क केले असता सदर महिलेने मोबाईल नंबर स्विच ऑफ करून कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी सायबर सेल हिंगोली येथे येऊन घटनाक्रम सांगितला. त्यांची अडचण लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे जमादार प्रदीप झुंगरे, मारुती काकडे, दत्ता नागरे, प्रणिता मोरे यांनी तातडीने माहिती घेण्यास सुरुवात केली.

या पथकाने सदर मोबाईलचे डिटेल्स घेतले असता सदरची महिलाही ठाणे जिल्ह्यातील कल्याण उल्हासनगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर सेल हिंगोली ने कल्याण तालुका पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून सपोनि दत्तात्रय नलावडे कल्याण तालुका पोलीस स्टेशन यांच्यामार्फतीने उल्हासनगर येथील सदर महिलेचा पत्ता मिळवला व चुकून गेलेले ८० हजार रुपये तात्काळ परत करा अन्यथा कायदेशीर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याबाबत बजावले. त्यानंतर सदर महिलेच्या नातेवाईकांनी तक्रारदार अशोक लठाड यांचे ८० हजार रुपये तात्काळ परत केले. त्यानंतर लठाड यांनी आईच्या उपचारासाठी पैसे भरले.

आईच्या हॉस्पिटलच्या कामासाठी पाठवलेले पैसे हिंगोलीच्या सायबर सेलची तत्परता अशोक लठाड यांनी वर्धा येथे त्याच्या भावाच्या फोन पे नंबरवर ८० हजार रुपये पाठविले परंतु फोन पे (Phone pay) चा एक नंबर चुकीचा टाकल्याने ते पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेले. लठाडयांनी संबंधित फोन वर संपर्क साधला. परंतु प्रतिसाद मिळाला नसल्याने ते हतबल झाले होते. सायबर सेलला धाव घेताच त्यांनी तत्परता दाखविल्याने ८० हजार रुपये तात्काळ परत मिळाले.

अचानक दुसऱ्या अकाउंट वर गेले व ज्यांच्या अकाउंट वर गेले त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने अशोक लठाड यांच्यासमोर आईच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला होता परंतु सायबर सेलच्या मदतीने तक्रारदार यांचे पैसे तात्काळ परत मिळून दिल्याने तक्रारदार अशोक लठाड यांनी हिंगोली पोलीसांचे आभार मानले.

Related to this topic: