Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

यशस्वी सापळा कारवाई : खिल्लारच्या तलाठ्याला 14 हजारांची लाच घेताना अटक

हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात गुरुवार, 5 जून 2026 रोजी ही सापळा कारवाई यशस्वी करण्यात आली.


यशस्वी सापळा कारवाई  खिल्लारच्या तलाठ्याला 14 हजारांची लाच घेताना अटक

Hingoli ACB Trap |

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी

हिंगोली (Hingoli ACB Trap) : वडिलोपार्जित शेतीच्या फेरफार करून सातबारावर नाव लावण्यासाठी 22 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खिल्लार सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 14 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात गुरुवार, 5 जून 2026 रोजी ही सापळा कारवाई यशस्वी करण्यात आली. 

सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील 25 वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांना हक्कसोड वाटणीतून 5 एकर वडिलोपार्जित शेती मिळाली होती. या शेतीचा फेरफार करून सातबारावर वडिलांचे नाव लावण्यासाठी सज्जा खिल्लारचे तलाठी रामेश्वर अर्जुन रोडगे, वय 43 यांनी 2 जून 2026 रोजी तक्रारदाराकडे 22 हजार रुपयांची मागणी केली होती. नाईलाजाने तक्रारदाराने त्याच दिवशी 8 हजार रुपये दिले. उर्वरित 14 हजार रुपये दिल्याशिवाय काम करणार नाही असे तलाठ्याने सांगितले होते. 

या संदर्भात तक्रारदाराने 5 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी त्याच दिवशी सेनगाव येथे पडताळणी करण्यात आली. पंचासमक्ष झालेल्या भेटीत तलाठी रोडगे यांनी यापूर्वी 8 हजार रुपये घेतल्याचे मान्य केले आणि उर्वरित 14 हजार रुपयांची मागणी करून आजच रक्कम स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले. 

पडताळणीनंतर तातडीने सापळा रचण्यात आला. सायंकाळी हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात आरोपी तलाठी रामेश्वर रोडगे याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष 14 हजार रुपये लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. 

आरोपीच्या अंगझडतीत आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय ओळखपत्र, एसबीआय बँकेची 2 एटीएम कार्ड, व्हिवो कंपनीचा मोबाईल आणि 6,750 रुपये रोख रक्कम आढळून आली. मोबाईल हॅन्डसेट तपासणीनंतर आवश्यकतेनुसार जप्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सध्या आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

या प्रकरणी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस अटक केली जाणार आहे. 

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुलभा राऊत करीत आहेत.

Related to this topic: