Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिम

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत 100 टक्के काम पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार

SIR Campaigns: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीत विशेष सखोल पुनरोगण कार्यक्रमात मतदाणा केंद्रस्थापकांना १००% पूर्णपणे करून देण्याच्या कामासाठी गौरवित केले.


विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत 100 टक्के काम पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार

SIR Campaigns |

 

मतदार पडताळणी, गणना पत्रक वितरण व डिजिटायझेशनची कामे वेळेत पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा गौरव

हिंगोली (SIR Campaigns) : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मतदार पडताळणी, गणना पत्रक वितरण व डिजिटायझेशनची कामे शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सत्कार करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहीम सुरू असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण 1015 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या कार्यास सहाय्य करण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत 37 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

या विशेष मोहिमेदरम्यान मतदारांना गणना पत्रकांचे वितरण, प्राप्त गणना पत्रकांचे संकलन तसेच माहितीचे डिजिटायझेशन ही प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात आली. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा गौरव करून जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तसेच निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सत्कार करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वसमत विधानसभा मतदारसंघातील टी. टी. जंगले, मुंजाजी असोले, सुरेश जाधव, कळमनुरी मतदारसंघातील एस. डी. लोंढे तसेच हिंगोली मतदारसंघातील जी. एन. वानखेडे, श्रीमती एस. के. चव्हाण, आर. जे. अंडीले, डी. एम. गडदे, पी. यू. राजपूत आणि ए. एस. धुमाळ यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती प्रगती चोंडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related to this topic: