Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आखाडा बाळापूर पोलीस स्थानक

आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाचे कामकाज आता नवीन इमारतीतून सुरू

Akhada Balapur Police Station: हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पोलिस स्‍थानकाची जुनी इमारत भु‐कम्पामुळे तडपून नव्याने ७० लाखांच्या खर्चावर बांधण्यात आलेली नवीन इमारतवर काम सुरू.


आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाचे कामकाज आता नवीन इमारतीतून सुरू  

Akhada Balapur Police Station |


भूकंपामुळे जिर्ण इमारतीला तडे, साडेतीन कोटींच्या नव्या इमारतीत स्थलांतर

आखाडा बाळापूर (Akhada Balapur Police Station) : हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पोलीस स्थानकांपैकी एक असलेल्या आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाचे कामकाज अखेर नव्या इमारतीतून सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पन्नास वर्षांहून अधिक जुनी झालेली आणि भूकंपात तडे गेलेली इमारत सोडून साडेतीन कोटी रुपये खर्चून उभारलेल्या भव्य इमारतीत गुरुवारीपासून स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

नवीन इमारतीचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले होते. मात्र विविध तक्रारींमुळे हस्तांतरण रखडले होते. 8 जुलै रोजी झालेल्या भूकंपात आधीच जीर्ण झालेल्या जुन्या इमारतीला मोठ्या भेगा पडल्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने आपत्कालीन परवानगी देत स्थलांतराचे आदेश दिले. त्यानंतर नवीन इमारतीत कामकाज सुरू करण्याच्या हालचाली दिसून येत आहेत.

शुक्रवारी नवीन इमारतीमध्ये वायरलेस यंत्रणा, सीसीटीएनएस यंत्रणा आणि इतर तांत्रिक कामे पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू होती. पीएसओचे कामकाज मात्र अद्याप जुन्या इमारतीतूनच चालू होते. लवकरच संपूर्ण कामकाज नव्या इमारतीतून सुरू होणार आहे.

परभणी जिल्हा असताना आणि नंतर हिंगोली जिल्हा झाल्यानंतरही आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाला विशेष महत्त्व आहे. जुन्या काळापासून येथे ठाणेदार म्हणून काम करण्यासाठी स्पर्धा असायची. पूर्वी परभणी जिल्ह्याच्या काळात पोलीस स्थानक जुन्या गावात कार्यरत होते. त्यानंतर 1970 ते 72 या काळात नांदेड हिंगोली मुख्य रस्त्यावर स्वतःच्या विस्तीर्ण जागेत सध्याची इमारत आणि एक अधिकारी व पंधरा कर्मचाऱ्यांसाठी पोलीस वसाहत बांधण्यात आली होती.

या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात डोंगरकडा, रामेश्वर तांडा पोलीस चौकी आणि वारंगाफाटा पोलीस मदत केंद्राचा समावेश आहे. याशिवाय आखाडा बाळापूर, बोल्डा, येहळेगाव, तुकाराम साळवा ही बिट गावे आणि इतर वाड्या तांडे मिळून एकूण 94 गावे या हद्दीत येतात. महामार्गासह इतर प्रमुख रस्त्यांवर अपघात आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण नेहमीच अधिक असल्याने या ठाण्यावरील कामाचा ताण मोठा आहे.

जुनी इमारत पन्नास वर्षांहून अधिक जुनी झाल्याने अनेक ठिकाणी खराब झाली होती. पावसाळ्यात काही भागात पाणी यायचे. अनेकदा दुरुस्ती करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे नवीन पोलीस स्थानक इमारत आणि पोलीस कर्मचारी वसाहतीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून सर्व आवश्यक सुविधांनी युक्त नवी इमारत उभी राहिली आहे. 55 बाय 90 चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या इमारतीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बंदीगृह, कॉन्फरन्स हॉल, महिला विश्रामगृह, पुरुष विश्रामगृह, कोर्ट क्लार्क रूम, वायरलेस रूम, सीसीटीएनएस केबीन आणि प्रत्येक अधिकारी व विभागासाठी स्वतंत्र कक्ष अशी व्यवस्था करण्यात आली आहे.