Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

घरकुल लाचखोरी प्रकरण

घरकुलाच्या अहवालासाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले..

Gharkul Bribery Case: लाच स्वीकारताना सवना ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. रामप्रसाद ज्ञानोबाराव खिल्लारी


घरकुलाच्या अहवालासाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

Gharkul Bribery Case |

हिंगोली (Gharkul Bribery Case) : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात घरकुल योजनेच्या संयुक्त पाहणी अहवालावर सही करून तो पंचायत समितीकडे पाठवण्यासाठी 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना सवना ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. रामप्रसाद ज्ञानोबाराव खिल्लारी असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. सवना येथील 60 वर्षीय तक्रारदाराच्या नावे घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाच्या संयुक्त पाहणी अहवालावर स्वाक्षरी करून तो सेनगाव पंचायत समितीकडे पाठवण्यासाठी ग्रामसेवक खिल्लारी यांनी 12 मे 2026 रोजी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा करण्यासाठी 13 मे रोजी पडताळणी कारवाई करण्यात आली. त्यावेळी (Gharkul Bribery Case) ग्रामसेवकाने सुरुवातीला दोन ते तीन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने "पैसे जास्त होतात" असे म्हटल्यावर त्याने 500 रुपये कमी करून 2,500 रुपयांवर तडजोड केली व पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. पडताळणीनंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला. गोरेगाव चौफुली येथे अतिथी बार अँड रेस्टॉरंटसमोर सेनगाव रोडवर ग्रामसेवक खिल्लारी यांनी तक्रारदाराकडून 2,500 रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपतच्या पथकाने त्याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.

अंगझडतीत आरोपीकडून वन प्लस कंपनीचा मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक डायरी आणि 5,600 रुपये रोख रक्कम मिळून आली आहे. मोबाईल तपासून गरज भासल्यास जप्त केला जाणार आहे. सध्या आरोपीच्या घराची झडती सुरू आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याला अटक केली जाणार आहे.

ही (Gharkul Bribery Case) कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती सुलभा राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या प्रकरणाचे पर्यवेक्षण व तपास पोलीस उपअधीक्षक श्री विकास घनवट करीत आहेत. या यशस्वी सापळा कारवाईमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.