Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली गुन्हे दाखल

हिंगोलीत दोन जीवंत काडतूससह गावठी पिस्टल जप्त

Hingoli Crime Case: पोलिसांनी हिंगोलीत गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसांचा ताबा घेतला आहे. आरोपी बाळाजी बंगर या २४ वर्षाचे गुन्हेगारी करणार्‍या परिचिताने गावठ्यापसंदीच्या पिस्टले


हिंगोलीत दोन जीवंत काडतूससह गावठी पिस्टल जप्त

Hingoli Crime Case |

हिंगोली ( Hingoli Crime Case) : हिंगोली शहरात गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणार्‍या रेकॉर्डवरील आरोपीला हिंगोली शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी करण बालाजी बांगर वय २४ वर्षे राहणार वंजारवाडा हिंगोली हा ह.मु. खटकाळी मंदिराजवळ गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगून हिंगोली शहरातील सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहे. ही खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे, पोहेकॉ सुनील अंभोरे, पोहेकॉ दिलीप लेकुळे, पोहेकॉ संतोष कन्हे, पोहेकॉ आकाश बोधीकर, पोहेकॉ भुषण जोगे आणि पोहेकॉ बाबासाहेब कांबळे यांच्या पथकाने तात्काळ पंचासह सापळा रचला.  

यावेळी आरोपी करण बांगर हा औढा नाका रोडजवळ असलेल्या स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरताना मिळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सदर गावठी पिस्टल आणि काडतुसे तात्काळ जप्त केली. या (Hingoli Crime Case) प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के हे करीत आहेत.

ही (Hingoli Crime Case) संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रेयिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आगामी काळात येणार्‍या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हिंगोली शहरात हत्यार बाळगणार्‍यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.